Advertisement

भारत जोडो न्याय यात्रेला बिरसा फायटर्सचा सक्रिय पाठिंबा;दिवसा होळी पेटवण्याला विरोध!

नंदूरबार: राहूल गांधी यांच्या नेतृत्वात नंदूरबार मध्ये दिनांक १२ मार्च २०२४ रोजी आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा देत समर्थन केले आहे.या भारत जोडो यात्रेत बिरसा फायटर्स संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवला आहे.या यात्रेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,पप्पू आर्या,राकेश मोरे,रमेश पटले,राजेंद्र मोते, मुन्ना बादले,हिरामण खर्डे,शंकर ठाकरे, बिरबल पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
        मोदी सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे आदिवासींवर अन्याय, शेतकऱ्यांवर अन्याय, युवक युवतींवर अन्याय, व्यापारी दुकान दारांवर अन्याय, महिलांवर अत्याचार होत आहे.देशात बेरोजगार ,महागाई वाढली आहे ,त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. सरकारी बॅन्क, उद्योग यांचे खाजगीकरण करण्यात आले आहे.संविधान खत्म करण्याच्या गोष्टी सत्ताधारी उघड पणे बोलत आहेत. संविधान वाचवण्यासाठी, सर्व सामान्य माणसांच्या न्यायासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा देत आहोत. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
          या कार्यक्रमात आयोजक तसेच काँग्रेस आमदार के.सी.पाडवी यांनी दिवसा होळी पेटवण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.आदिवासी संस्कृती,परंपरा,रितीरिवाजानुसार होळी रात्री पेटवण्याची परंपरा आहे,दिवसा होळी पेटवल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या असून आदिवासींच्या संस्कृती व परंपरेला ठेस पोहचवणारे हे चुकीचे काम करण्यात आले आहे.त्याचा आम्ही सामूहिक रित्या विरोध दर्शवणार आहोत,असे सुशिलकुमार पावरा म्हणाले.

Post a Comment

0 Comments