Advertisement

दगड उमेदवार नको- सुशिलकुमार पावरा

शहादा- महाविकास आघाडीची सर्व पक्षीय व संघटनांची बोधीवृक्ष परिसर शहादा येथे नुकतीच जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली.या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षांसह आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, महाराष्ट्र राज्य भील समाज संघटना ,सातपुडा पावरा समाज उन्नती मंडळ, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी,भील प्रदेश मोर्चा,सातपुडा बचाओ आंदोलन इत्यादी संघटना पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो, तो दगड जरी असला तरी चालेल,त्याला निवडून आणूया,असे मत उपस्थितीत काही प्रतिनिधींनी व्यक्त केले.
                        बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आपल्या संघटनेची भूमिका स्पष्ट करत म्हटले की,महाविकास विकास आघाडीकडून योग्य उमेदवार दिला गेला तरच आमचा पाठिंबा असेल, आम्हाला दगडासारखा उमेदवार चालणार नाही,आम्ही दगडाला मतदान करणार नाहीत. सुशिलकुमार पावरा यांना आपली बाजू मांडण्यास म्हाता-या लोकांनी अडवले.तरी सुशिलकुमार पावरा यांनी रोखठोक सांगितले की,आमचा जुन्या आदिवासी नेत्यांना विरोध आहे,ते बिनकानाचे आहेत. नवीन पिढीला दगड , निष्क्रिय उमेदवार नको.आमचा निष्क्रिय आमदार, मंत्री यांना विरोध आहे. समाजाचे प्रश्न लोकसभेत मांडणारा,समस्यांवर बोलणारा,सक्रीय,लोक ओळखतात असा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला उमेदवार हवा.निष्क्रिय,मुका, दगड,लोक ओळखत नाहीत, असा उमेदवार नको,अशी रोखठोक भूमिका बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सभेत मांडली.

Post a Comment

0 Comments