Advertisement

पैसे व दारू वाटणा-यांना मतदान करू नका: सुशिलकुमार पावरा

"Note Not Vot- पैसे वाटणा-यांना मत नाही" अभियान बिरसा फायटर्स राबविणार

गाढव की माणूस बनणार?ठरवा

बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक: ६

शहादा: पैसे व दारू वाटून मत मागणे,ही गोष्ट नवीन नाही.१००,५०० रूपयांत काही मतदार आपले अमूल्य मत विकून टाकतात.एका गाढवाची किंमत ही १०००० हजार रूपये पेक्षा जास्त असते.परंतु ५०० रूपयांत विकले जाणारे मतदार हे गाढवापेक्षा कमी किंमतीचे ठरतात. आपण माणूस आहोत, गाढव नाहीत, याचे भान ठेवले पाहिजे.पैसे वाटणारा उमेदवार हा सत्तेतून पैसे कमावण्यासाठीच निवडून येतो.ग्रामपंचायत निवडणूक पासून लोकसभा निवडणूक ह्या सर्व निवडणूक पैशाशिवाय जिंकता येत नाहीत. असा लोकांमध्ये गैरसमज आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही उमेदवारांनी एवढे पैसे खर्च केले,विधानसभा निवडणुकीत आम्ही एवढे पैसे वाटले. अशी सर्रास चर्चा करताना काही निवडून आलेले व पराभूत झालेले उमेदवार खुलेआम करताना दिसतात.पैसे व दारू वाटून मते मांगणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे.निवडणूक जवळ आली की,कुणी मोफत साड्या वाटतो,कपडे वाटतो,गॅस वाटतो,शेळ्या,मेंढ्या , बैल वाटतो.मतदारांना लुबाडण्याचे हे राजकीय तंत्र आहे.मतदारांना आमीश दाखवून निवडून येण्याची मानसिकता आजही काही उमेदवारांत आहे.पैसे वाटून मत मागणे ही पद्धत आम्ही "Note Not Vot- पैसे वाटणा-यांना मत नाही", हे अभियान राबवून बंद करणार आहोत. 
                   मतदार हा राजा आहे.
मतदान करणे हे देशसेवा आहे.मतदान करणे हा आपला महत्वाचा हक्क व अधिकार आहे.लोकशाहीने आपल्याला अनेक सुविधा,हक्क-अधिकार दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासनाची स्थापना होते. मुक्त व निर्भीड वातावरणातून मतदारांनी मतदान करायला पाहिजे.निवडणूकीच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता आपल्याला मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे.१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदान करण्याचा हक्क आहे. नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे हे मतदानाच्या माध्यमातून कळते.देशाच्या विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे.देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता येईल यासाठी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीं हे सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारांनी विचारपूर्वक आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
                  नुसत्या भेटीगाठी,आश्वासने आणि आर्थिक आमीश देणा-यांना तुम्ही मत देणार का?हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वत;ला विचारायला पाहिजे.कुणाला मतदान करायचे हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.आजही अनेक लोक आहेत, ज्यांना मतदानाचे महत्त्व कळत नाही . देशात अशाच काही लोकांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले जातात. देशाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही.मतदारांनी येणा-या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तीशाली राष्ट्र बनवण्यास सहकार्य करावे.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments