Advertisement

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध बिरसा फायटर्स बिग फाईट

हा गोवाल पाडवी कोण? काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सने सुशिलकुमार पावरा नावाचा आपला तगडा व दमदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.सुशिलकुमार पावरा यांना ५० पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे.यात २६ ग्रामपंचायत व सामाजिक संघटना,संस्था यांचा समावेश आहे. आपण स्वतंत्र व अपक्ष लढण्यास तयार आहोत.या ५० संघटनांचा पाठिंबा शेवटपर्यंत राहिल्यास आपण अपक्ष उमेदवार म्हणूनही ही निवडणूक जिंकू शकतो,असा विश्वास सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केला आहे.
          महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून डाॅक्टर हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात येईल, अशी आशा लोकांना होती.परंतु महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याकारणाने काँग्रेस कडून अचानकपणे नामांकन केलेल्या उमेदवारांना वगळून माजी मंत्री के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी या उनोळख्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे.हा गोवाल पाडवी कोण? असे काँग्रेस समर्थक वाॅटसप ग्रूपवर प्रश्न विचारण्यात आले.आम्ही याला बघितले नाही. आम्ही याला ओळखत नाहीत. हा कुठला आहे?कुठे राहतो? काय करतो?बापाचा राजकीय वारसा जपण्यासाठी काँग्रेसने कदाचित गोवाल पाडवींना उमेदवारी दिली असावी, अशी वाॅटसप वर चर्चा रंगली आहे.गोवाल पाडवी यांचे काँग्रेस कडून नाव समोर आल्यानंतर ही निवडणूक महायुतीने जिंकली,भाजपच्या हिना गावीतची जीत पक्की,असा जल्लोष करण्यात येत आहे.परंतु मैदानात सुशिलकुमार पावरा हे बिरसा फायटर्सचे विरोधकांना बिग फाईट देणारे तगडे उमेदवार आहेत, याचा महायुतीच्या उमेदवारांना विसर पडला.सुशिलकुमार पावरा यांना ८ पक्षांची तिकीट ऑफर झाल्यानंतर पक्षातर्फे नको तर अपक्ष उमेदवार म्हणून लढले तरी आपण ही निवडणूक १००% जिंकू.असा विश्वास बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात महायुती विरूद्ध महाविकास आघाडीची टक्कर होणार नसून महायुती विरूद्ध बिरसा फायटर्स म्हणजेच भाजपचे हिना गावीत विरूद्ध बिरसा फायटर्सचे सुशिलकुमार पावरा यांच्यातच ही बिग फाईट होईल, असे वातावरण तयार झाले आहे.

Post a Comment

0 Comments