शहादा- जिल्हा परिषद रत्नागिरी येथील शिक्षणसेवक नियुक्ती प्रक्रियेची स्थगिती उठवून नियुक्ती द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार, जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा नंदूरबार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,करण सुळे, कृष्णा ठाकरे,लहू सनेर,तुळशीराम भील आदि १०-१२ कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे दिनांक १८/०३/२०२४ रोजीच्या पत्रान्वये शिक्षणसेवक नियुक्तीला स्थगिती दिली आहे व वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे,असे संबंधित शिक्षणसेवक यांना कळविले आहे.पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षणसेवकांची समुपदेशन प्रक्रिया दिनांक १९/०३/२०२४ व २०/०३/२०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतु आचारसंहितेचे प्रसिद्धीपत्रक दिनांक ०७/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदरच्या प्रसिद्धीपत्रकात मुद्दा क्रमांक ७(९) अनुसार आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये,सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या देण्यात येणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिनांक १७/०३/२०२४ रोजीच्या पत्रानुसार निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगीची मागणी केली आहे.सदरची परवानगी अद्याप प्राप्त झाली नाही.परवानगी प्राप्त होतीच समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे. सदर पत्रात निवडणूक आयोगाने दिनांक ०७/०१/२०२४ रोजी आचार संहितेचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असे म्हटले आहे असूनही दिनांक १९/०३२०२४ व दिनांक २०/०३/२०२४ रोजी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे,म्हणून शिक्षणसेवकांना कळविण्यात आले.त्यांना मुलाखत ठिकाणी बोलावल्याने नाहक त्रास झाला ,आज उद्या नियुक्ती देतो म्हणून विद्यार्थांना विनाकारण थांबविण्यात आले.शिक्षणसेवक यांना नियुक्तीपत्र दिले असते तरी काही अडचण निर्माण झाली नसते.निवडणूक आयोगाचे पत्र समोर करून शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी जाणीवपूर्वक शिक्षणसेवकांना नियुक्तीपत्र देण्यात दिरंगाई केलेली आहे. शिक्षणसेवक नियुक्तीला स्थगिती देऊन शिक्षणसेवकांच्या सेवा देण्यापासून वंचित ठेवले आहे,नोकरीच्या आनंदाला हिरमोड केला आहे.नियुक्तीबाबत दिरंगाई केल्यामुळे शिक्षणसेवकांवर अन्याय होत आहे.तरी जिल्हा परिषद रत्नागिरी येथील शिक्षणसेवक नियुक्तीबाबतची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी,हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.
0 Comments