Advertisement

सुशिलकुमार पावरा यांनी ८ पक्षांची टिकीट नाकारली ; अपक्ष लढणार

अपक्ष उमेदवाराला वाढता पाठिंबा; काँग्रेस व भाजप उमेदवारांना पक्षांतर्गतच विरोध

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीकडून दिल्ली येथे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सुशिलकुमार पावरा यांना ५० पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा मिळाला आहे.यात बिरसा फायटर्सचे जोयदा,चूलवड, गणोर इत्यादी २६ ग्रामपंचायत व ५० संस्था,संघटना व समितींचा समावेश आहे.आपल्याला कोणत्याही पक्षाची तिकीट मिळाली नाही तरी आपण स्वतंत्र व अपक्ष लढण्यास तयार आहोत.या ५० संघटनांचा पाठिंबा शेवटपर्यंत राहिल्यास आपण अपक्ष उमेदवार म्हणूनही ही निवडणूक जिंकू शकतो,असा विश्वास व लढण्याची भूमिका सुशिलकुमार पावरा यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना एकूण ८ पक्षांची तिकीट ऑफर करण्यात आली आहे.यावर चर्चा करण्यासाठी वडगांव येथे सभा घेण्यात आली.
                    आपली बिरसा फायटर्स संघटना ही आदिवासी विचारधारेवर चालणारी आहे.संघटनेचे ध्येय, धोरण ठरलेले आहेत. आपण स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून काम करतो.आपण कुणाच्या हाताखाली काम करत नाहीत. पक्षांची गुलामी आपल्याला स्वीकार नाही.म्हणून 
आपण कोणत्याही पक्षाची टिकीट घ्यायची नाही,अपक्ष लढायचे.हारलो काय आणि जितलो काय, आपल्याला काही फरक पडत नाही.नाव आपले बिरसा मुंडाचे राहील. पक्षांचे नाव मोठे का करायचे.पक्ष नको,अपक्ष लढा,असे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सुचवले.त्यामुळे पक्ष विरूद्ध अपक्ष अशी सरळ लढत नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात होणार आहे. अपक्ष उमेदवार म्हणून लढले तरी आपण ही निवडणूक १००% जिंकू.असा विश्वास बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.सभेला बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय अध्यक्ष विलास पावरा,नंदूरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,बिरबल पावरा,राहुल पावरा,चुनीलाल पावरा,काकड्या पावरा,मंगेश मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांचा वाढता पाठिंबा,पसंती याऊलट काँग्रेस व भाजप पक्षातीलच नाराज गटाचा अधिकृत उमेदवाराला वाढता विरोध बघता काँग्रेस व भाजप उमेदवाराला मते मिळवायला मोठी कसरत करावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments