Advertisement

पक्षातली घराणेशाही संपवा- सुशिलकुमार पावरा

घराणेशाही की कार्यकर्ते जिंकतील?

बिरसा फायटर्सच्या उमेदवाराला ४ गावांचा पूर्ण पाठिंबा

शहादा: महाविकास आघाडीच्या जिल्हा सभेत मी आमच्या बिरसा फायटर्स संघटनेची स्पष्ट व रोखठोक भूमिका मांडली आहे.आमचा काँग्रेस पक्षाला विरोध नाही परंतू काँग्रेसचे निष्क्रिय आमदार के.सी.पाडवी यांना विरोध आहे.कारण ते आपल्या ३५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या गावाचा रस्ता बनवू शकले नाहीत.ते काय जिल्ह्याचा विकास करतील? आपला मुलगाच खासदार, आमदार व्हायला पाहिजे,पत्नी, मुलगी,भाऊ,बाप हे आपल्या घरातलेच सत्तेवर राहायला पाहिजे.अशी घराणेशाही नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात भाजप व काँग्रेस व इतर काही पक्षांत सुरू आहे.ही पक्षांतली घराणेशाही बंद झाली पाहिजे.कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? यांच्या पाठोपाठ फिरायचे का? सामान्य कार्यकर्त्यांचा हे अजिबात विचार करत नाहीत. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी या घराणेशाहीपासून सावध राहिले पाहिजे.
                 आपल्याच घरातला खासदार व्हायला पाहिजे,या उद्देशाने हे पक्षातले उमेदवार निवडूक लढवत आहेत. परंतु आम्ही नंदूरबार लोकसभाश्रॆत्र भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे,खड्डेमुक्त व्हायला पाहिजे,रोजगार मिळायला पाहिजे,स्थलांतर थांबले पाहिजे,गावोगावी वाचनालये बांधणार, आदिवासी क्रांतीकारकांचे स्मारके बांधणार, वनदावे १०० मंजूर करणार अशे जनतेच्या मनातील उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडूक लढत आहोत .
         काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून जो उमेदवार जाहीर करण्यात आला,त्या व्यक्तीला त्याच्या गावातील लोक ओळखत नाहीत, काँग्रेस कार्यकर्ते ओळखत नाहीत, हा गोवाल पाडवी कोण? कुठे राहतो? काय करतो? यांनी सामाजिक कार्य काय केले? असे उलटसुलट प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत.काँग्रेस पक्षाने अशक्त उमेदवार जाहीर केल्यामुळे उमेदवाराचे नाव समजताच भाजप म्हणजेच महायुतीच्या लोकांनी विजयी जल्लोष केला,आता आपली जीत पक्की,असा दावा केला आहे.परंतु जनतेला भाजप व काँग्रेस हेच पर्याय नाहीत, तर बिरसा फायटर्सचा उमेदवार हा तिसरा पर्याय आहे. काँग्रेस उमेदवार या निवडणूक स्पर्धेत असून नसल्यासारखा आहे,तो हारण्यासाठीच उभा करण्यात आला आहे.आम्ही त्याची गणती करत नाही.आमची टक्कर थेट भाजप उमेदवाराविरोधात आहे.२६ ग्रामपंचायत व संस्था,संघटना अशे ५० संघटनांचा पाठिंबा मला शेवटपर्यंत राहिल्यास आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू. असा विश्वास आहे.
             माझ्या आजीने मरेपर्यंत पंज्याला म्हणजेच काँग्रेस उमेदवाराला मतदान केले.स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामांवर विश्वास ठेवून आमचे घराणे डोळे मिटून काँग्रेसला मतदान करत होते. परंतु आताच्या काँग्रेस नेत्यांनी ४० वर्षांत आम्हाला साधे रस्ते बनवून दिले आहेत.घराणेशाहीचे राजकारण सर्व पक्षांत सुरू आहे. ज्यांनी कुणी काँग्रेस तर्फे ज्याला कोणी ओळखत नाही,त्या गोवाल पाडवीला उमेदवारी दिली,त्यांना आमचे खुले चॅलेंज आहे की,तुम्ही आमच्या बिरसा फायटर्सच्या उमेदवाराएवढे मते मिळवून दाखवा.आमची लढत भाजप उमेदवाराशी आहे.आम्हाला भाजप उमेदवाराला हरवायचे आहे.घराणेशाही संपवायला मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला सपोर्ट करा,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments