Advertisement

आरोपी लड्डू पाटील फरार;पोलीस पकडण्यात अपयशी!

लड्डू पाटील सापडल्यास पोलीसांना कळवा; पोलिसांचे आवाहन

शहादा: औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणा-या लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांवर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी ,या मागणीसाठी दिनांक २ मार्च २०२४ रोजी आदिवासी समुदायाच्या आक्रोश मोर्चाची आयोजन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा पर्यंत करण्यात आले होते. मोर्चा ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला.आरोपी लड्डू पाटील गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे,आम्ही त्याच्या घरी मामा मोहिदा येथे जाऊन आलो.आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे शोध पथक तयार केले आहे.आरोपी आम्हाला सापडत नाही.लोकांना दिसल्यावर पोलीसांशी संपर्क साधावा.आम्ही आरोपीला पकडू, अशी प्रतिक्रिया शहादा येथील पोलीस अधिका-यांनी दिली आहे.आरोपीला पोलिसांनी शोधायला पाहिजे की आपण जनतेनी शोधायला पाहिजे,असे ऊलटसुलट प्रश्न लोकांनी उपस्थित केले.
                  शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ६ पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे,मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरिराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली आहे. आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)(VA) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेत सौरभ शेवाळे,बादल ठाकरे,दिपक पवार, सचिन ठाकरे, पप्पू ठाकरे यांच्यासह इतर मुलांना जबर मारहाण झाली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता १० दिवस झाले तरी आरोपी हा दुस-या समाजाचा आहे म्हणून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यास, गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत,आमच्या आदिवासी समाजाचा आरोपी असता तर एका मिनीटात पोलीसांनी अटक केली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्चेक-यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments