Advertisement

आदिवासी क्रांतीकारकांचे स्मारके बांधणार- सुशिलकुमार पावरा

बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक:८

शहादा- नंदूरबार जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात येणारे 
धुळे जिल्ह्यातले शिरपूर व साक्री हे दोन तालुके सुद्धा आदिवासी बहूल तालुके आहे.क्षेत्र आदिवासी असूनही या श्रेत्रात आदिवासी क्रांतीकारकांचे स्मारके दिसून येत नाहीत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतीकारकाचा लढा खूप मोठा ठरला.आदिवासी क्रांतीकारकांनी इंग्रज साम्राज्याविरोधात लढा उभारला व आंदोलन केली व देशासाठी बलिदान दिले.क्रांतीकारक बिरसा मुंडा, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे,राॅबीडहूड तंट्या मामा भील, खाज्या नाईक, राणी झलकारीबाई, राणी दुर्गावती, तिलका मांझी ,वीर बाबुराव शेडमाके, क्रांतीकारक सोमा डोमा, हुतात्मा नाग्या कातकरी, तेजा भील,उमाजी नाईक, राणा पूंजा भील ,भागोजी नाईक,जयपालसिंह मुंडा, राणापुंजा भील, हल्दीभाई भील, गोंड राजे शंकरशहा, झलकारी देवी,सिद्धू, कान्हू, राज, भैरव इत्यादी तसेच वीर एकलव्यची पूजा करणारा आमचा आदिवासी आहे.आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास दडपण्यात आला.परंतू आता क्रांतीकारकांचा इतिहास फोटो, लेखकांच्या माध्यमातून जनमानसात समोर येत आहे. 
                        स्वातंत्र्यासाठी लढणारा आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांना लोकांनी देवाचा दर्जा दिला आहे.भगवान बिरसा मुंडा,धरती आबा बिरसा मुंडा, जननायक बिरसा मुंडा,क्रांतिवीर बिरसा मुंडा अशा विविध नावांनी संबोधले जाते.१५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती आदिवासी समूदाय मोठ्या संख्येने एकत्र जमून जयंती उत्सव साजरा करतात. इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना कैद करून रांची येथील कारागृहात ९ जून १९०० रोजी रहस्यमय रित्या मारले.म्हणून आदिवासी समाज या दिवशीही बिरसा मुंडा यांची आठवण ठेवून स्मृतीदिन कार्यक्रम घेतात. आदिवासीं क्रांतीकारकांचा लढा प्रेरणादायी आहे. म्हणून क्रांतीकारकांची प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी आदिवासी क्रांतीकारकांचे स्मारके, पुतळे जिल्ह्य़ात आवश्यक आहेत.आम्ही नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात ठिकठिकाणी क्रांतीकारकांचे स्मारके बांधू, तुम्हाला जर आदिवासी क्रांतीकारकांची स्मारके नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात हवी आहेत, असे वाटत असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला सपोर्ट करा.असे प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली.

Post a Comment

0 Comments