Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना ५० संघटनांचा पाठिंबा


१०० पेक्षा अधिक पाठिंबा पत्र मिळण्याचा अंदाज

शहादा : महाविकास आघाडीकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना द्यावी,आमचा त्यांना पाठिंबा आहे,अशी मागणी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ५० पेक्षा अधिक संघटनांनी केली आहे.यात बिरसा फायटर्सचे जोयदा,चूलवड, गणोर इत्यादी २६ ग्रामपंचायत व  जय आदिवासी युवा शक्ती (जयस),महाराष्ट्र ट्रायबल आघाडी,लाल भावटा ट्रायबल युनियन महाराष्ट्र प्रदेश, राजपूत्र एकलव्य भिल निषाद राष्ट्रीय एकता मंच, सातपुडा बचाओ आंदोलन,भील प्रदेश मोर्चा,एकलव्य संघटना शहादा,पावरा समाज संघ महाराष्ट्र,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी शिक्षक संघटना ,महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना ,सातपुडा पावरा समाज सेवा संघ, ऑल इंडिया काॅन्फडेरेशन ऑफ एसटी एससी ऑर्गनायझेशन,अखिल भारतीय आदिवासी पावरा समाज मण्डल,महाराष्ट्र राज्य अपंग कामगार संघटना,महिला बचत गट शहादा,कालिका माता ट्स्ट धडगांव, भिलवंश ग्रूप शहादा,शाळा व्यवस्थापन समिती खेरवा व वडगांव, नाभिक सेना,सुतगिरणी युनियन,जय रावण प्रतिष्ठान ,आदिराजे ग्रुप इत्एयादी कूण ५० संस्था,संघटना व समितींचा समावेश आहे.हा पाठिंबा वाढतच असून १०० च्या आसपास पाठिंबा पत्र मिळतील असा अंदाज बांधला जात आहे.
              सुशिलकुमार पावरा हे ५०० पेक्षा अधिक वेळा उपोषण करणारे भारतातले पहिले व्यक्ती आहेत.lnternational idol,राष्ट्रीय कलामित्र, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, शिक्षक, कवी,लेखक, पत्रकार  गायक,नृत्यक, कराटेपटू,उपोषणकर्ता, समाजसेवक अशी चांगली ओळख सुशिलकुमार पावरा यांची जनमानसात आहे. मराठी,इंग्लिश, हिंदी या भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे.
                बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचे एकूण ३५६ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद संख्या आहे.२६ लोकनियुक्त सरपंच असून ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.सामाजिक कामांत नेहमीच अग्रेसर असणारे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहेत. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाचे? म्हणून ट्रा पोलवर सुशिलकुमार पावरा- बिरसा फायटर्स, के.सी.पाडवी-काॅग्रेस, हिना गावित-भाजप व इतर असे पर्याय ठेवण्यात आले.त्यात आपल्या पसंतीनुसार जनतेने वोटींग करून सुशिलकुमार पावरा यांना विजयी केले आहे.सध्यस्थितीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेची पहिली पसंती सुशिलकुमार पावरा हेच आहेत. आमचा सुशिलकुमार पावरा यांना जाहीर पाठिंबा आहे.त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा उमेदवारी हा  १००% जिंकेल. असा आम्हाला विश्वास आहे.म्हणून महाविकास आघाडीकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनाच उमेदवारी द्यावी,अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments