Advertisement

गावोगावी वाचनालये बांधणार-सुशिलकुमार पावरा

जुन्या पुढा-यांनी मंदिरे बांधली,आम्ही वाचनालये बांधू:सुशिलकुमार पावरा

बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक ७

शहादा: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,वाचाल तर वाचाल. कारण वाचनाच्या माध्यमातून मानवाचे जीवन घडू शकते.म्हणून नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात आम्ही गावोगावी वाचनालये बांधणार आहोत, ग्रंथालये सुरू करणार आहोत. हा आमचा प्रमुख उद्देश असेल.आजही अनेक गावात मंदिरे आहेत. परंतु वाचनालये नाहीत. जुन्या पुढा-यांनी मंदिरे बांधली.आदिवासी लोकांना फक्त घंटा वाजवायला शिकवले. आम्ही वाचनालये बांधून कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिक दृष्ट्या व्यक्तीला परिपक्व करण्याचा प्रयत्न करू. पुस्तक वाचल्याने आपले ज्ञान वाढते.वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट आहे,ज्यामुळे आपली बुद्धीमत्ता अधिक वाढते.वाचन हे माणसाचे जीवन फुलवते. 
                  आज आपले जीवन मनोरंजन करण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने आहेत. टिव्ही,मोबाईल, काँप्युटरवर अनेक गेम खेळू शकतो.संगित ऐकू शकतो.चित्रपट पाहू शकतो.इंटरनेट वापरणे ही साधने आपल्याला मानसिक आनंद देतात. पण त्याऐवजी लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आपल्याला खरा आनंद मिळू शकतो. पूर्वीच्या वेळी विविध विषयांची पुस्तके मिळण्याचे ठिकाण ग्रंथालय होते.आता पुस्तकांची जागा इंटरनेट ने घेतली आहे.त्यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत आहे.
                   वाचन करणे हा चांगला छंद आहे.आपण सगळ्यांनी विविध पुस्तके वाचली पाहिजेत व इतरानांही वाचायला सांगायला पाहिजेत. विद्यार्थांना वाचन करायला प्रवृत्त केले पाहिजे.गावागावांत सार्वजनिक वाचनालये सुरू केल्यानंतर ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नाही,अशी सर्वसामान्य लोक वाचनालयात पुस्तके व वृत्तपत्रे वाचू शकतील.तुम्हाला सुद्धा गावागावांत वाचनालये असावीत, असे वाटत असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला अवश्य सपोर्ट करा,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments