Advertisement

नंदूरबार लोकसभेसाठी सुशिलकुमार पावरांची आघाडी;महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस

इंडिया आघाडी सदस्य बिरसा फायटर्सच्या कामांवर खुश!

शहादा: येत्या काही दिवसांतच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. आगामी लोकसभेच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांनी व नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.नंदूरबार लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा आहे.परंतु मोदी लाटेत ही जागा १० वर्षे भाजपकडे गेली. मुख्यत काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच नंदूरबार लोकसभेत लढत होते.मात्र यावेळी बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेने सुशिलकुमार पावरा नावाचा आपला तगडा व दमदार उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेस व भाजपचा उमेदवार नव्हे तर बिरसा फायटर्सचा उमेदवार बाजी मारेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
                        नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाला,म्हणून स्ट्रा पोलवर दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सोशल मिडीयावर ,५०० पेक्षा अधिक वाॅटसप ग्रूपवर लिंक टाकण्यात आली.त्यात मा.सुशिलकुमार पावरा- बिरसा फायटर्स, मा.के.सी.पाडवी- काँग्रेस, मा.हिना गावित-बिजेपी व इतर असे पर्याय ठेवण्यात आले.यात बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे जिंकले असून अजूनही आघाडीवरच आहेत. पोलींग वोटचा हा निकाल काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्काच देणारा ठरला आहे.कारण ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्स उमेदवारांनी काँग्रेस व भाजप पक्षांच्या उमेदवारांना धक्का देत २६ ग्रामपंचायतची निवडणूक जिंकली आहे.
                      महाविकास आघाडीकडून नंदूरबार लोकसभेची काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यात आली असून इच्छुक उमेदवारांपैकी आमदार के.सी.पाडवींना वाढता विरोध ,पक्षांतर्गत नाराजी,काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी के.सी.पाडवींवर केलेले गंभीर आरोप,यामुळे काँग्रेस पक्षाकडून के.सी.पाडवींना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.तसे स्वत: के. सी.पाडवी यांनी बोलून दाखवले आहे की,मी उमेदवारीसाठी इच्छुक नाही.माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व त्यांची कन्या सिमा वळवी यांचे नाव चर्चेत होते.परंतु पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चर्चेतलं नावालाही विराम लागला आहे.सामाजिक कामात सदैव तत्पर व सक्रिय असणारे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचे नाव महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी समोर आले आहे.उमेदवारीची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान इंडिया आघाडीचे सदस्य हे नंदूरबार येथे भारत जोडो यात्रेत सुशिलकुमार पावरा व बिरसा फायटर्स टिमला भेटले असून बिरसा फायटर्सच्या सामाजिक कामांवर प्रभावित झाले आहेत. सुशिलकुमार पावरा यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचा म्हणजेच महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी आम्ही ही जागा जिंकूच, असा विश्वास बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments