Advertisement

आदिवासी आमदार आमशा पाडवी यांना बोलू देत नाहीत;बिरसा फायटर्स आक्रमक

 
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा निवेदन देऊन केला निषेध

शहादा: आदिवासी आमदार तथा विधानपरिषद सदस्य मा.आमशा पाडवी यांना विधानपरिषदमध्ये बोलू दिले जात नसल्याबद्दल बिरसा फायटर्स आदिवासी संघटनेतर्फे मा. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शहाद्याचे तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,रविंद्र पावरा,संतोष तडवी,सुकराम पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानपरिषदेत आमचे अक्राणी- अक्कलकुवा मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य तथा आदिवासी आमदार मा.आमशा पाडवी यांना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ह्या बोलू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया मा .आमशा पाडवी यांनी दिली आहे.हा लोकशाहीला गळा दाबण्यासारख्या प्रकार आहे.विधानपरिषदेत आमच्या आदिवासी आमदाराला बोलू देत नसल्याबद्दल आम्ही आमच्या बिरसा फायटर्स आदिवासी संघटनेतर्फे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.    
                       
  विधानपरिषदेत आमच्या भागातील विषय मांडण्यासाठी मा. आमशा पाडवी यांची विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झालेली आहे.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदमध्ये आमशा पाडवी यांच्या रूपात आदिवासींचे प्रश्न मांडणारा एकमेव आमदार आदिवासी समाजाला लाभला आहे.आमच्या आदिवासी लोकप्रतिनिधींना बोलू न देऊन त्यांची गळचेपी केली जात आहे.नंदूरबार जिल्ह्य़ात सद्यपरिस्थितीत एका मातेचा प्रसुती दरम्यान आरोग्य सेवेच्या अभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे,बालकांचा रोज मृत्यू होत आहे.अशा गंभीर समस्या जिल्ह्य़ात सुरू असताना आमच्या बोलणा-या आमदाराला बोलू दिले पाहिजे,तो त्यांचा अधिकार आहे.परंतु अशा पद्धतीने भेदभाव केला जात असेल तर ही दुर्दैवी बाब आहे.यापुढे आमच्या आदिवासी आमदाराला विधानपरिषदेत बोलू दिले नाही,तर आम्ही आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments