Advertisement

Validity शिवाय उच्च शिक्षणात प्रवेश देऊ नका: बिरसा फायटर्सची मागणी

उच्च शिक्षणमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

शहादा: उच्च शिक्षणात जात वैद्यता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देऊ नका, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,गोपाल भंडारी,सोमनाथ पावरा,महेश प्रधान व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च शिक्षणाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथील करण्यात आली आहे.केवळ जात प्रमाणपत्रावरून या उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो.काही उमेदवार हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा सादर केल्याची पावती आधारे प्रवेश घेत असतात. ही अत्यंत चूकीची प्रवेश पद्धत आहे.या उच्च शिक्षणाच्या २ ते ४ वर्षांच्या कालावधीत जात वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या उमेदवारांनाही अखेर पदवी व पदवीका पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.पदवी व पदवीका मिळाल्यानंतर या उमेदवारांना जात वैद्यता प्रमाणपत्राची गरज भासत नाही.परंतु अशे उमेदवार अनुसूचित जमातींच्या जागांवर सवलतींच्या आधारे उच्च शिक्षणाची पदवी व पदवीका प्राप्त करून घेतात.हे आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी बाब आहे.म्हणून जात वैद्यता प्रमाणपत्राशिवाय उच्च शिक्षणात प्रवेश देऊ नका,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments