Advertisement

टोकर तलाव आश्रमशाळेतील मुलींचा छळ; मुख्याध्यापिका निलंबित; गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

शहादा: नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करणा-या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस अधीक्षक नंदूरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी,एकनाश वळवी,आनंद शेवाळे,जालिंदर पावरा,योगेश मोगरे, शंकर ठाकरे,आनंदसिंग शेवाळे,प्रकाश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                        नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रम शाळेत मुलींना तेथील मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा ह्या मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करत असल्याची घटना दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडकीस आली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्याध्यापिका या विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच रात्री अप रात्री विद्यार्थिनींना महाराणीच्या घटना देखील वाढल्या होत्या .या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी शाळेला भेट दिली असता या ठिकाणी याचवेळी पोलीस प्रशासन व संबंधित शाळांचे सदस्य देखील उपस्थित झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांना निलंबित करण्यात आल आहे. 
               आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी या आश्रम शाळेत शिकत आहेत .गाव पाढे दूरवर असल्याने वस्तीगृहात राहत आहेत. याचा गैरफायदा येथील प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी घेऊ नये.या पुढे असे प्रकार होऊ नयेत, म्हणून कस्तुरबा गांधी मुलींची आश्रम शाळा टोकरतलाव ता.नंदुरबार जि.नंदुरबार येथील मुलींना मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करणा-या श्रीमती शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments