Advertisement

सादरी गावात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ? विद्यार्थी कसे बसे शिक्षण घेते आहे


 *दि.09/02/2024रोजी धडगांव* तालुक्यातील तोरणमाळ परिसर म्हणून ओळख असलेले अतिदुर्गम आदिवासी भागात सादरी हे गाव आहे. सादरी हे गाव उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाच्या काही भाग नर्मदा नदीच्या बुडित क्षेञात येतो व उवर्रित जागेवर ७० ते ८० कुटुंबाची मनुष्य वस्ती आहे. पण या गावापर्यंन्त जायला व गावात पक्का रस्ता नाही. सादरी या गावाहून धडगांव ला बाजार करण्याकरिता नर्मदे नदीतून बोटीने प्रवास करून भुषा पाॅंईट गावापर्यंन्त येवून तिथून स्थानिक भाड्याच्या फोर व्हीलर वाहन मध्ये बसून धडगांव ला ये-जा करावे लागते. तसेच गावातील महिला-पुरूष पिण्याकरिता विहीर, हातपंप नसल्यामुळे पाणी हे दोर्‍या खोर्‍यातील झरातून, नर्मदा नदीच्या व नालाचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. तसेच ग्रामस्थ हे विज, रेशन धान्य,जि.प.शाळा व अंगणवाडी केंद्रापासूंन वंचित दिसून येतात. 
या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीना व संबंधीत प्रशासनाला वेगवेळी योजना व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सांगितले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन ऐकण्याच तयार नाही.
सादरी या गावात मध्यप्रदेश मधील रेवामैया शैक्षणिक संस्था हि ४० विद्यार्थ्यांना शिक्षण देत *तर* यंग फाॅंऊडेशन संस्था धुळे जि.धुळे हि ४० ते ४५ विद्यार्थ्यांना शिक्षण देते हे वर्ग फक्त इयत्ता १ ली ते २ री पर्यंन्त चालते. हि शाळा सादरी गावातील एक सामाजिक कार्यक्रर्ते गुडा पावरा यांच्या घरा जवळ एका पडित कुडाच्या घरात शाळा भरते व या शाळेतील शिक्षक हे गिलदार सरदार पावरा व भुवानसिंग भरमसिंग पावरा ह्या दोघ शिक्षकांना कमी मानधनावर विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात.या शाळेतील विद्यार्थ्यांना २ वर्ष पुर्ण झाल्यानंतर पुढिल शिक्षणसाठी रामभरसे अशी अवस्था दिसून येते. नंदुरबार सारख्या आदिवासी गाव पाड्या पर्यंन्त डिजिटल शिक्षण पध्दत सूरू होवून सुद्धा डोंगराळ अतिदुर्गम सादरी सारख्या गावकडे जिल्हा परिषद नंदुरबार येथील शिक्षण विभाग लक्ष देत नसेल तर दुदैवी बाब दिसून येते. नंदुरबार जिल्हातील धडगांव व अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी ३२ ते ३५ गावातील ग्रामस्थांची काय हालअपेष्टा असेल. शासनाला सादरी ग्रामस्थांची एकच विनंती आहे आम्ही नर्मदा नदीच्या पाण्याखाली जीवन जगत नाही तर आम्ही जमीनीवर घर बांधून राहतो आम्हाला पण हक्काने जीवन जगु द्या विकासात्मक मार्गवर घेवून जा जेणे करून येणारी भावी पिढी तरी चांगले शिक्षण घेईल असे मनन आहे.
 *यावेळी* .. किसन पावरा महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार तथा पञकार, डेबरा पावरा,भुवानसिंग पावरा, सामा पावरा, रामज्या पावरा, शिलदार पावरा, वकल्या शिवला पावरा, ऐमना पावरा, भांगा पावरा, गणेश जोरदार पावरा, काव्या पावरा, थिक्या पावरा, सोबा पावरा आदी ग्रामस्थ शाळा पाहणी वेळी उपस्थित होते.

 किसन पावरा धडगांव प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments