Advertisement

विद्यार्थांची शिष्यवृत्ती बंद,बिरसा फायटर्स आक्रमक, आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन
शहादा;महाराष्ट्रात एम फार्मसी (पी.जी) स्कॉलरशिप मिळावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                           एम.फार्मसी पी.जी (स्कॉलरशिप) साठी GPAT परीक्षा उत्तीर्ण होऊन ही, दरवर्षी दरम्यान दिली जाणारी पी.जी शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. आणि त्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही.GPAT पात्र विद्यार्थ्यांसाठी 2022 पर्यंत स्टायपेंड AICTE ने दिलेला आहे परंतु AICTE ने फार्मसीला तांत्रिक शिक्षणातून बाहेर केल्या कारणाने UGC ने GPAT स्टायपेंड देण्याचा निर्णय झाला.या शिष्यवृत्ती नोंदणी आणि वितरणास उशीर केल्याने GPAT पात्र विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे.१) UGC संलग्न नसलेल्या कॉलेज साठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची कोणतीही नियमावली नव्हती.
२) अंतिम तारीख ३१ डिसेंबर होती परंतु UGC पोर्टलवर त्याचा उल्लेख नव्हता.परंतु शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची योग्य प्रक्रिया नमूद केलेली नसल्याने आम्ही विद्यार्थी या साठी अर्ज करू शकलो नाही.
 त्यामुळे संबंधित विभाग आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, विद्यार्थांना लवकर ही न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments