बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक ३
शहादा. नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात रोजगार उपलब्ध करून देणे,हे आमचे तिसरे ध्येय आहे.बेरोजगारी हा या मतदारसंघाचा विकास न होण्याची प्रमुख समस्या आहे.नवीन नवीन उद्योग आणणे, सूतगिरणी ,कारखाने,फॅक्टरी आणणे,बंद झालेले कारखाने, सुतगिरणी सुरू करणे. हा आमचा उद्देश असेल. नंदूरबार लोकसभाश्रॆत्राचा विचार केला तर येथील बांधव दरवर्षी रोजगार नसल्यामुळे गुजरात राज्यात ऊस तोडायला व मजूरीसाठी जातात. पंढरपूर अशा ठिकाणी मजूरीसाठी जातात. दरवर्षीच हे स्थलांतर होत असते.हे स्थलांतर थांबतच नाही.कारण येथील नेत्यांनी या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून दिले नाहीत. त्यांची इच्छा शक्तीच नाही. म्हणून आजही येथील लोक रोजगारासाठी भटकंती करत असतात. लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन हे स्थलांतर आम्ही कायमचेच थांबवू.
या लोकसभाश्रॆत्रात ३ साखर कारखाने आहेत. एक शहाद्यात, दुसरा साक्रीत,तीसरा शिरपूरला.हे कारखाने बंद अवस्थेत आहेत. सुतगिरणी होत्या.त्या सुतगिरणी बंद आहेत.त्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देवू. या मतदारसंघात तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे.ते ठिकाण दुर्लक्षित आहे.सारंगखेडा मध्ये दत्त जयंती निमित्त दरवर्षी चेतक फेस्टीवल भरतो,यात्रा भरते.तेही दुर्लक्षित आहे. दाब, अस्तंबा,दहेल, बिलगाव, तिनसमाळ, वार्ली,अशी पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे विकसित केली तरी रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
नंदूरबार व नवापूर मध्ये एम आय डी सी आहे.तेथेही रोजगार नाही.अनेक तरुण उच्च शिक्षण, डिग्री घेऊन बेरोजगार आहेत, नोकरी,रोजगार नसल्यामुळे निराश आहेत. यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. जिल्ह्यात एवढे मंत्री,खासदार, आमदार, नेते झालेत यांनी कधीच या मतदारसंघात उद्योग आणून लोकांना रोजगार मिळावा,असा विचार केला नाही.ते काम आता आम्ही करू.आमच्यात उद्योग आणण्याची,रोजगार मिळवून देण्याची इच्छाशक्ती आहे.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात तुम्हाला व तुमच्या मुलांना रोजगार हवा असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला जरूर सपोर्ट करा.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments