Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'जननायक बिरसा मुंडा' असे नाव द्या: बिरसा फायटर्सची मागणी

शहादा: जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचे 'जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय, नंदूरबार 'असे नामकरण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,रेवसिंग खर्डे,रायसिंग खर्डे,गुलाबसिंग पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तसेच जिल्ह्यात पूर्वीपासून सर्वात जास्त आदिवासी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे, त्यामुळे जिल्ह्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात उद्भवणारे विविध रोगांचे निदान व औषधोपचार व संशोधनाचा बहुतांश उपयोग व लाभ आदिवासी जमातीतील लोकांनाच होणार आहे. आदिवासी जमातीतील जननायक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यानंतर आदिवासी जमातीतील लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. बिरसा मुंडा यांनी राणीचे राज्य संपवा, आमचे साम्राज्य स्थापित करा, असा नारा दिला होता.
                      त्याच प्रेरणेने जिल्ह्यातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण 'जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार' असे करण्यात यावे, अशी जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातीतील लोकांची ईच्छा व्यक्त होत आहे. करिता समस्त आदिवासी पावरा समाज मंडळ, नंदुरबार यांचेकडून जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातींतील लोकहितार्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण 'जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार' असे करण्यात यावे, यासाठी आपणांस सविनय निवेदन सादर करीत आहोत.
                 तरी महोदयांनी उपरोक्त निवेदित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण 'जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार' असे करण्यासाठी आपल्यास्तरावरून वरीष्ठ पातळीवर आवश्यक ते सर्वपरीने पाठपुरावा व प्रयत्न करून जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातीतील लोकांना सहकार्य करावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments