शहादा पोलीस निरीक्षकांमार्फत नंदूरबार पोलीस अधीक्षक यांना निवेदन
शहादा:पोलीस ठाणे शहादा येथे भा.दं.सं.१८६० कलम ३०२,३०७,४४७,१४३,१४७,१४८,१४९,३,२५,४,३१(१),३७(३),१३५ अन्वये खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात आरोपी असणारे १) सुनिल राजेंद्र पावरा २) गणेश दिवान खर्डे ३)अरुन राजेंद्र पावरा ) यांना जामीन न देऊ नका, जामीन झाल्यास बिरसा फायटर्स आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन शहाद्याचे पोलीस निरीक्षक यांना बिरसा फायटर्स तर्फे देण्यात आले.
शेतीच्या वादातून मलगांव ता.शहादा जि.नंदुरबार येथे अविनाश सुखराम खर्डे( मुलगा) व सुखराम कलजा खर्डे (वडील )यांना गावठी गट्ट्याने- बंदूकीने गोळ्या झाडून ठार मारण्यात आले.या घटनेबाबत पोलीस ठाणे शहादा येथे दिनांक २७/०७/२०२३ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुनिल राजेंद्र पावरा,गणेश दिवान खर्डे,सोनीबाई गणेश खर्डे,अरून राजेंद्र पावरा,ललिताबाई राजेंद्र पावरा,रमीबाई दिवान खर्डे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२,३०७,४४७,१४३,१४७,१४८,१४९,३,,२५,४,३१(१),३७(३),१३५ अन्वये खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक करण्यात आली आहे.सदर आरोपी जामीन मिळावा,म्हणून विविध कारणे दाखवून कारागृहाबाहेर सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.आणि मागच्या वेळेस आम्ही बिरसा फायटर्स मार्फत निवेदन देण्यात आले होते की, जामीन न मिळणेबाबत तरी सुद्धा वरील ६ आरोपी पैकी १) सोनीबाई गणेश खर्डे २) ललिताबाई राजेंद्र पावरा ३) रमीबाई दिवान खर्डे यांना जामीन मंजूर करण्यात आले आहे,आणि आता सुद्धा वरील पैकी आरोपी १) सुनिल राजेंद्र पावरा २) गणेश दिवान खर्डे ३) अरुन राजेंद्र पावरा यांना सुद्धा जामीन मंजूर व्हावा म्हणून हाई कोर्टात आपले जामीन अर्ज याचिका दाखल करण्यात आले आहे,
खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक झालेल्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यास पुन्हा या आरोपींकडून खुनाचे दुष्कृत्य घडून मयतच्या नातेवाईकांस तसेच समाजातील इतर व्यक्तींच्या जीवितास धोका उद्धभवू शकतो.तसेच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गावातील वातावरण बिघडू शकते. आरोपींस कायद्यानुसार फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.तरी वरील खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक असणा-या आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन मंजूर होवू नये, अन्यथा आम्ही बिरसा फायटर्स मार्फत पोलिस स्टेशन येथे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा बिरसा फायटर्सने दिला आहे.
0 Comments