Advertisement

ॲस्ट्रासिटीतील आरोपी लड्डू पाटील व सहका-यांना तात्काळ अटक करा , आदिवासी संघटना आक्रमक

२४ फेब्रुवारीला आदिवासी संघटनांचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा समोर ठिय्या आंदोलन

शहादा: औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणा-या लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांवर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी ,या मागणीसाठी आदिवासी संघटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत.आंदोलनाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,औरंगपूरचे सरपंच एकनाश वळवी,उपसरपंच आनंद शेवाळे, शिवसेना युवा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,शंकर ठाकरे,योगेश गमरे,प्रकाश पावरा ,आनंदसिंग शेवाळेआदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                            शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ६ पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे,मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरिराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली आहे.सदर घटना दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून त्याच दिवशी तक्रारदार शहादा पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. दुस-या दिवशी पोलीस ठाण्यात मारहाणीची साधी तक्रार (एनसी) नोंदवत होते,नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)(VA) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्य़ातील कलम पोलिसांच्या मर्जीप्रमाणे लावण्यात आले आहेत. जबर मारहाण ५ पेक्षा अधिक मुलांना झाली असली तरी फक्त एका मुलाची फिर्याद नावे बादल लडू ठाकरे वय १९ रा.औरंगपूर यांच्या नावाने घेण्यात आली आहे.घटनेत सौरभ शेवाळे,बादल ठाकरे,दिपक पवार, सचिन ठाकरे, पप्पू ठाकरे यांच्यासह इतर मुलांना जबर मारहाण झाली आहे. घटनेशी संबंधित पोलीस हे आरोपींना वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. घटनेतील आरोपींचे अश्लील भाषेतील व धमकीचे संभाषण कायदा व सुववस्थेचा प्रश्न निर्माण होईल,असे संभाषण सोशल मिडीयावर वायरल होत आहे.तरीही पोलीस आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास दिरंगाई व कुचराई करत आहेत.ही घटनेतील आदिवासी मुलांवर अन्यायकारक बाब आहे.
             आरोपींविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी ,आरोपींना तात्काळ अटक करावी,अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत,अशी प्रतिक्रियाही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व पालकांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी दिला होता.
          घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यास, गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत, म्हणून आम्ही नाईलाजास्तव आदिवासी समुदायातर्फे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

Post a Comment

0 Comments