आज 19 फेब्रुवारी ग्राम पंचायत कार्यालय गणोर येथे मराठा साम्राज्य स्थापन करणाऱ्या धाडसी योद्धा महाराष्ट्राचे अखंड आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी. करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण देशभर अभिमानाने घेतले जाते. त्यांनी आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी मुघलांपासून पासून संरक्षण करण्यासाठी अशी अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे महाराजांचे नाव इतिहासाच्या पृष्ठांवर सुवर्ण पत्रांमध्ये नोंदवले गेले आहे. असे प्रतिपादन ग्रा. पं सदस्य राहुल रावताळे यांनी दिली ह्यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती शीतल रावताळे ग्रा. पं सदस्य अनिता भामरे, भगतसिंग निकम कविता भामरे, ममता वळवी,संतोष पान पाटील ,अजित पटले, चंद्रकांत शेल्टे कैलास ठाकरे शिपाई ओंकार शेल्टे ,वसंत शेल्टे, शाळेतील मुल व ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments