Advertisement

अल्पवयीन आदिवासी मुलीची छेडछाड करणा-या आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी

शहादा: शिरपूर तालुक्यातील मुखेड गावातील प्रायव्हेट संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करा ,आरोपींना पदावरुन काढून टाका व आरोपींविरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार posco चा गुन्हा दाखल करून अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पोलीस अधीक्षक धुळे,पोलीस निरीक्षक शिरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,औरंगपूर चे सरपंच एकनाश वळवी,उपसरपंच आनंद शेवाळे, शिवसेना युवा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,योगेश मोगरे,शंकर ठाकरे, आनंदसिंग शेवाळे,प्रकाश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                          शिरपूर तालुक्यातील मुखेड गावात पारोळा येथील एक प्रायव्हेट संस्था म्हणून आश्रम शाळेला मान्यता दिली आहे. त्या संस्थेत आदिवासी भागातील मुले मुली शिक्षण घेत आहेत.त्या संस्थेत एक शिपाई पदावर हर्षी पाटील रा,नगरदेवडा ता पाचोरा जि जळगाव येथील रहिवासी असुन त्याची नियुक्ती शिरपूर तालुक्यात मुखेड गावात कार्यरत आहे. तरी त्या शिपाईने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलींनी सदर घटनेची माहिती लॅबोरेटरी शिक्षकांकडे दिली.शिपाई ची तक्रार केली होती, परंतु त्या शिपाई वर कुठल्या प्रमाणे कारवाई करण्यात आली नाही.म्हणून मुलीनी सदर घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. पालकांनी व गावातील सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित संस्था वर जाऊन विचारपूस केली की, तो शिपाई कोण आहे ?तो शिपाई ज्यांनी असे अश्लीलता केली, तेव्हा संस्था येथून आरोपी फरार झाला होता, लॅबोरेटरी शिक्षक व शिपाई म्हणून दोन व्यक्ती होते त्यांना विचारपूस करण्यात आले .तेव्हा त्यांनी सांगितले की, संबंधित संस्था चालकांनी त्या शिपाईला संपर्क साधुन फरार होण्यास सांगितले आले आहे. मुलींनी सांगितले की सदर घटनेची माहिती आम्ही या शिक्षकांना दिली होती, परंतु यांनी सांगितले की काय झाले मग येवढे तेवढे होत असते. आमची तक्रार घेणे टाळाटाळ केली, तेव्हा मुलींचे गावातील लोकांनी त्या लॅबोरेटरी शिक्षक व शिपाई यांना पकडून शहादा पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.तरी जो शिपाई हर्षी पाटील रा नगरदेवडा यांच्यावर Posco अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे व तसेच मुखेड येथील संस्थांच्या मान्यता तात्काळ रद्द करुन संबंधित संचालक यांना आरोपीना फारार करण्यास मदत केली .म्हणून त्यांचा वर सुद्धा कारवाई करण्यात यावी.हीच नम्र अशी विनंती,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments