Advertisement

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या: बिरसा फायटर्सची मागणी

शहादा: एकलव्य मॉडेल निवासी शाळेत सेवेत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आदिवासी विकास मंत्री व आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी,करन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    गेल्या काही वर्षापासून शिक्षक कंत्राटी माध्यमातून चालविणाऱ्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत गेल्या ३ ते ५ वर्षापासून अध्यापनाचे प्रामाणिक काम करून गुणवत्तासह निकालही चांगला लावला.मात्र,नुकतेच केंद्र स्तरावरुन संपूर्ण देशात एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचे भरती प्रक्रिया राबविली आणि दोन दिवसापूर्वी निकाल घोषित करण्यात आले.यात महाराष्ट्रातुन खूपच कमी उमेदवारांची निवड झाली.या भरती प्रक्रियेत अस्पष्टता व त्रुटी आढळून आल्या आहे.त्यामुळे निवड प्रक्रियेतच प्रश्न चिन्ह आहे.केंद्र स्तरावरुन येत्या काहीं दिवसात निवड उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.तीन ते पाच वर्षे एका आशेने रात्रंदिवस अध्यापनाचे प्रामाणिक काम केले.त्यांच्या जागी दुसरा कायम शिक्षक येत असल्याने काम करत असलेल्या शिक्षकांचे काय?कमी मानधनावर रात्रंदिवस काम करूनही विचार होत नसल्याने शिक्षक चिंताग्रस्त आहे.अनेक कर्मचाऱ्यांचे वयही असल्याने यापुढे अर्ज करण्याची संधी नाही.कुटूंब चालवयाचे कसे?असा प्रश्न पडला आहे.
          सहानुभूतीपूर्वक विचार करून,वरील संदर्भानुसार उच्च न्यायालय गुजरात व संदर्भ २-उच्च न्यायालय उत्तराखंड निकालानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे ही विनंती.अन्यथा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बिरसा फायटर्स तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाला देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments