Advertisement

आदिवासी मुलाला लाथा बुक्यांनी मारहाण करणा-या मुख्याध्यापक व व्यवस्थापकावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा: बिरसा फायटर्सची मागणी

पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदन


शहादा :बहिणाबाई धनाजी महाजन आश्रम शाळा गुढे ता.भडगाव जि.जळगाव येथील शाळेत विदयार्थ्यांला अमानुषपणे मारहाणीची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक जळगाव व पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,गोपाल भंडारी,सोमनाथ पावरा,महेश प्रधान, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   गुरुवार दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी बहिणाबाई धनाजी महाजन आश्रम शाळा गुढे ता.भडगाव जि. जळगाव येथील आश्रम शाळेत इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या कु.नितीनकुमार मोग्या वळवी रा.दहेल ता.अक्कलकुवा या विदयार्थ्यांला मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांनी लाथ्या-बुक्यानी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे.जबर मारहानीने विदयार्थ्यांचा डाव्या कानाचा पडदा फाटला आहे.शहादा येथे खाजगी दवाखान्यात दाखविल्यानंतर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सदर विद्यार्थी उपचार घेत आहे.सदर दिवशी विद्यार्थी आपल्या मित्रासोबत गेटचा बाहेर जात असतांना आपल्या भाषेत मजाक करून हसले.बाजूला असलेल्या मुलींच्या व्यवस्थापिका मॅडमांना वाटले;मला हसले.या कारणावरून शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांनी काहीही न विचारता;आल्या आल्या अमानुषपणे लाथ्या-बुक्यांनी वाटेल;त्या ठिकाणी मारहाण करण्यास सुरवात केली.त्यामुळे जबर मारहानीने विदयार्थ्यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटला आहे.ज्ञान मंदिरात त्यांचे मनने न मांडू देता;गैरसमज करून अमानुषपणे मारहाण होते;हे दुर्दैव आहे. 
        महोदय,सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर अट्रॉसिटी गुन्हातंर्गत कडक कारवाई करावी ही विनंती.अन्यथा, बिरसा फायटर्स तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments