Advertisement

गणोर ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन

:कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे व स्वच्छताअभियानाचे खरे जनक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ग्राम पंचायत कार्यालय गणोर येथे जयंती साजरी करण्यात आले 
गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत. हया वेळी सरपंच श्रीमती शितल रावताळे उपसरपंच कविता वळवी ग्राम सेवक गुलाब गावित,ममता वळवी , कविता भामरे,आंगणवाडी सेविका आशा ब्राह्मणे, अनिता वळवी, योगिता भामरे पेसा मोबिलायझर नामदेव वळवी, ग्राम सदस्य राहुल रावताळे, संतोष पान पाटिल सुनिल निकुंम, शिपाई ओंकार शेल्टे, व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments