Advertisement

२ मार्चला शहादा येथे आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा

लड्डू पाटील व सहकारी आरोपींना तात्काळ अटक करा,आदिवासी संघटना आक्रमक

शहादा: औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणा-या लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांवर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी ,या मागणीसाठी आदिवासी समुदायाचा शहादा येथे जनआक्रोश मोर्चा होणार आहे.मोर्चाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,जय आदिवासी ब्रिगेडचे सुरेश ठाकरे,अनिल पावरा,क्रिष्णा राऊत,आनंद शेवाळे,सुरज ठाकरे,क्रिष्णा पवार, नानु पवार, सुनील भंडारी,गब्बर सिंग ठाकरे,ललित शेवाळे,प्रभू नाईक, प्रविण माळी,जामसिंग सुळे,एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे राजू पवार, हेराम ठाकरे,विशाल पावरा,प्रमोद पाटील, संदीप रावताळे आदि २५ ते ३० कार्यकर्ते उपस्थित होते.
              शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ६ पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे,मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरिराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली आहे.आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)(VA) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बादल लडू ठाकरे वय १९ रा.औरंगपूर यांच्या नावाने फिर्याद देण्यात आली आहे.घटनेत सौरभ शेवाळे,बादल ठाकरे,दिपक पवार, सचिन ठाकरे, पप्पू ठाकरे यांच्यासह इतर मुलांना जबर मारहाण झाली आहे. 
                घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यास, गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत, घटना होऊन ८ दिवस पेक्षा अधिक झाले तरी आरोपींना पोलीसांनी अटक केली नाही,यात पोलिसांची आरोपींना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे ,पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणून आम्ही नाईलाजास्तव आदिवासी समुदायातर्फे दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा( मा.प्रांतअधिकारी कार्यालय ) पासून ते मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार पर्यंत आक्रोश मोर्चा काढणार आहोत,मोर्चाचे बरे वाईट परिणाम झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित पोलीस प्रशासन राहील ,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments