Advertisement

गांवात दारू विकणा-यांना महिलांनी झोडा:सुशिलकुमार पावरा

अंबरसिंग महाराज यांच्या ५० व्या प्रेरणा दिवसानिमित्त प्रबोधन

शहादा: अंबरसिंग महाराज यांचा ५० वा प्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी मोड (बोरद) ता.तळोदा जि.नंदुरबार येथे अंबरसिंग महाराज प्रेरणा दिवस समन्वय समिती जिल्हा नंदूरबार यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दिल्ली ,गुजरात तसेच नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील वक्ते व आदिवासी,दलित कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी,दलित, मजूर, कष्टकरी बांधवांचे कैवारी अंबरसिंग महाराज यांच्या प्रेरणा दिवसानिमित्त उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, अंबरसिंग महाराज यांनी त्यांच्या कालावधीत मजूर, श्रमिकांवर होणा-या अत्याचाराला श्रमिक संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडली.व्यसनमुक्ती साठी भजनाच्या माध्यमातून लोकजागृती केली.दारूचे मडके फोडून दारू बंदीचे कार्य केले.स्त्रीयांवर होणा-या अत्याचारांविरोधात आवाज उठवला.स्त्री पुरुष समानतेचा नारा दिला.त्यांची ही चळवळ आम्ही सुरू ठेवणार आहोत. अंबरसिंग महाराज यांची चळवळ सुरू ठेवण्याची जबाबदारी सर्व सामाजिक कार्यकत्यांची आहे.औरंगपूर येथील आदिवासी शेतमजुर मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करण्यात आली.त्या घटनेची साधी तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यात घेण्यात टाळाटाळ केली जात होती.अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने तक्रार दाखल करण्यात आली.परंतु आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.लड्डू पाटील व त्यांच्या सहका-यांना अटक होत नाही,तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. 
                   गावात दारू बंदी करायची असल्यास महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारू विकणा-यांनाच झोडायला पाहिजे.गावात दारू आपोआपच बंद होईल. गणोर गावात आमच्या महिला बिरसा फायटर्स टिमनी तसे काम केलेले आहे.व्यसनमुक्त झाल्याशिवाय आपला समाज सुधरणार नाही.वनपट्टेधारकांना वनदावे मंजूर करून देण्यास आमची संघटना काम करत आहे.ज्याप्रमाणे अंबरसिंग महाराज यांनी त्यांच्या काळात आदिवासी,दलित, शेतमजुर, स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी काम करून एक चळवळ उभी केली.ती चळवळ आम्ही सुरूच ठेवणार आहोत, असे मनोगत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments