Advertisement

प्रलंबित वनदावे मंजूर करा; अन्यथा बिरसा फायटर्सचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

प्रांत अधिकारी यांना बिरसा फायटर्सचे स्मरणपत्र

शहादा: शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील वनदावे मंजूरीच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सने केलेल्या ठिय्या आंदोलनातील लेखी आश्वासनावर अद्याप कार्यवाही झालेली नाही,त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करन पावरा,सतिश ठाकरे,अविनाश ठाकरे,वसंत चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील पुढीलप्रमाणे वनदावे प्रलंबित आहेत,ते मंजूर करावे या मागणीसाठी संदर्भ क्रमांक १ अनुसार बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.संदर्भ क्रमांक २ नुसार आंदोलन स्थळी निवेदन देण्यात आले होते.संदर्भ क्रमांक ३ अनुसार मा.उपविभागीय अधिकारी शहादा यांनी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना लेखी पत्र देऊन आश्वासन दिले होते.तरी पुढील वनदावे निकाली काढण्यात यावेत. 
                   वनदावे अर्जांवर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही,अपिलीय अर्जावर सुद्भा अद्याप सुनावणी झालेली नाही.त्या आशयाचे प्रमाणपत्र सुद्धा वनदावेदारांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधित वनहक्क समितीने अर्जदारांना तोंडी व लेखी पत्र दिलेले आहे.तरी सदरचे मंजूरीसाठी सादर करण्यात आलेले वनदावे निकाली काढण्यात यावेत.या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक २०/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन केले होते.त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाहीत. सदर वनदावे लवकरात निकाली काढण्यात यावेत. अन्यथा पुन्हा आपल्या कार्यालयासमोर आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल.याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments