Advertisement

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबन म्हाळसकर यांची बिनविरोध निवड


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सन्माननीय बबन म्हाळसकर यांची निवड झाली . सरचिटणीस पदी विठ्ठल भटकर , कार्याध्यक्ष राहुल वाघ, उपाध्यक्ष आनंद लोंढे , उपाध्यक्ष राहुल वाघोले, कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड यांची नियुक्ती झाली.यापूर्वी श्री संतोष गदादे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे पुणे जिल्हा जुने पेन्शन संघटनेची संपूर्ण कार्यकारिणीचा फेर निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व निवडी या बिनविरोध झाल्या. या निवडीला राज्य निरीक्षक म्हणून जितेंद्र फाफाळे व श्री प्रवीण गायकवाड यांनी काम पाहिले. प्रसंगी सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. सर्वप्रथम पेन्शन संकल्प यात्रा व त्याचबरोबर मुंबई येथील आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यानंतर कार्यकारणीची निवड करण्यात आली. अतिशय मनमोकळ्या आणि निकोप वातावरणात सर्व कार्यकारणीची निवड झाली. संतोष गदादे यांनी पदभार सोडण्याचे घोषणा करतात काही काळासाठी वातावरण हे भावनिक झाले. आपल्या संघटने प्रति असणाऱ्या भावना व्यक्त करताना सन्माननीय संतोष गदादे यांनी संघटनेच्या जडणघडणीचा इतिहास सांगितला. 40- 42 सभासदांपासून सुरू झालेला हा प्रवास आज लाखांच्या घरात पोहोचलेला आहे. आणि हा प्रवास पूर्ण करत असताना अनेक सहकार्यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच राज्य कार्यकारिणीने विश्वास दाखवल्याबद्दल श्री संतोष गदादे यांनी आभार मानले. 
संघटन हे व्यक्ती पेक्षा मोठा असतं आणि संघटनेमुळे व्यक्ती असते; व्यक्ती मुळे संघटन नसते. हे देखील त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 
               नवनियुक्त अध्यक्ष बबनराव म्हाळसकर यांनी संघटनेला पूर्णपणे योगदान देण्याचे तसेच येणाऱ्या काळात 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीसाठी सदैव उपलब्ध असण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
येणाऱ्या काळात पेन्शन मिळवण्यासाठी राज्यकारणी जे जे मार्गदर्शन करेल त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर असल्याचेही सांगितले. संघटनेत शिस्तही खूप महत्त्वाची असेल असेही त्यांनी सांगितले. सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान मावळते जिल्हाध्यक्ष संतोष गदादे व सर्व तालुकाध्यक्षांच्या वतीने करण्यात आला. प्रसंगी इंदापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष सचिन दराडे , दौंडचे तालुका अध्यक्ष महादेव बंडगर, बारामतीचे तालुकाध्यक्ष सुभाष वनवे, पुरंदरचे तालुकाध्यक्ष शरद पवार, वेल्हा, मुळशी मयूर कळमकर, हवेली, जुन्नर राहुल पडवळ, खेड सचिन गावडे, मावळ, इत्यादी तालुक्यातून बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments