Advertisement

सुशीलकुमार पावरांची वाढती पसंती, इच्छुक उमेदवारांची डोकेदूखी

नंदूरबार लोकसभेत भाजप, काँग्रेस ऐवजी अपक्ष उमेदवाराला पसंती

हिना गावित व के.सी.पाडवींचा सोशल मिडीयावर वाढता विरोध!

शहादा:आगामी लोकसभा निवडणूकीत नंदूरबार लोकसभेसाठी भाजपकडून हिना गावित व काँग्रेस कडून के.सी.पाडवी यांना उमेदवारी मिळू शकते.अशी राजकीय चर्चा सुरू आहे.आदिवासी तरूणावर सिधी येथे मुत्रविसर्जन अशा घटनेतून भाजप कार्यकर्त्यांकडून आदिवासी व्यक्तींवर अत्याचार व मणिपूर येथील आदिवासी महिलांवर अमानवीय अत्याचार, हंसदेव येथील जंगलतोड,आदिवासींसाठी आरक्षणात शून्य जागा अशा भाजप सरकार कडून आदिवासी विरोधीधोरण यामुळे आदिवासी बहूल असलेल्या नंदूरबार जिल्ह्य़ात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे आदिवासी मतदारांची मते भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत, असे चित्र दिसत आहे.खासदार हिना गावित यांनी नुकताच ट्विटर वर नंदूरबार लोकसभा मतदार संघातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.काय हा फालतूपणा आहे.असे मिडीयावर कमेंट्स करून लोकांनी विरोध दर्शवला.काँग्रेसचे अक्राणी अक्कलकुव्याचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी हा बिनकामाचा माणूस आहे.त्यांनी ३५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही,तो माणूस काय जिल्ह्य़ाचा विकास करेल?अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही खड्डेमय रस्ते आहेत. रोजगार नाही,म्हणून अजूनही आदिवासी बांधव गूजरातमध्ये ऊसतोडीसाठी व पंढरपूर अशा विविध भागात मजूरीसाठी जातात, आदिवासींचे स्थलांतर थांबतच नाही.अशा आमदार के.सी.पाडवी यांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे प्रचंड नाराज असलेला मतदार वर्ग जिल्ह्य़ात निर्माण झाला आहे.काँग्रेस पक्षाला मानणारे व के.सी.पाडवीला विरोध करणारे युवक वर्ग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे काँग्रेसने के.सी.पाडवीला उमेदवारी दिली तर आम्ही मतदान करणार नाही ,असे खुले आम म्हणणारा युवा मतदार वर्ग जिल्ह्य़ात दिसत आहे.
                    अशा वातावरणात मतदारांचा तीसरा पर्याय म्हणून बिरसा फायटर्सचे नंदूरबार लोकसभेचे उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना वाढती पसंती इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे.भावी खासदार सुशिलकुमार पावरा नावाचा वाॅटसप ग्रूपवर १०२५ सदस्य होऊन ग्रूप फूल हाऊस झाला आहे.बिरसा फायटर्सचा उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना मानणारा मोठा शिक्षित मतदार वर्ग समोर येत आहे.international idol, राष्ट्रीय कलामित्र, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, शिक्षक, कवी,लेखक,समाजसेवक, गायक, नृत्यक, कराटेपटू आणि ५०० वेळा उपोषण करणारे आदिवासींचे अण्णा हजारे अशी चांगली ओळख सुशिलकुमार पावरा यांची जनमानसात आहे.
                   बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात ३५५ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. २६ लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.संघटनेत शिक्षक,डाॅक्टर, वकील,आर्मी,पहिलवान, गायक, नृत्यक, संगितकार, लेखक, कवी,पत्रकार,शेतकरी,मजूर, विद्यार्थी,महिला तसेच आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे.

Post a Comment

0 Comments