Advertisement

नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार; आमदार, खासदार, मंत्री यांच्या गावातले रस्ते दुरुस्त करून देणार: सुशिलकुमार पावरा

बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक:४

शहादा:नंदूरबार लोकसभा श्रेत्रातील  रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यातील काही आमदार, खासदार, मंत्री यांच्या गावात जाणारे रस्तेच खड्डेमय आहेत,उखडले आहेत, ते स्वत: दुरुस्त करत नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या गावाचे रस्ते  दुरुस्त करून देणार आहोत. जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. तालुकानुसार विचार केला तर धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता ,माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे ,अस्तंभा कडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे.धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे.धडगाव हून चुलवड कालीबेल दाब अक्कलकुवा  या गावी जाण्यासाठी प्रवासी जरली मार्गाचा वापर करतात,परंतू जरली येथील पूलावरील लोखंड वर उखडून आले आहे,पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल,अशी स्थिती निर्माण झाली आहे,म्हणून लोक जरली मार्गाचा वापर न करता धडगांव हून राडीकलम मार्गे चूलवड कालीबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत. 
                      रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते.स्वत: श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले.
                शहादा तालुक्याचा विचार केला तर शहाद्याहून म्हसावद दरा कडे जाणारा रस्ता खूपच खराब झालेला आहे.सरकार व ठेकेदार दुरूस्तीचे ढोंग करत आहेत. वर्ष जास्त झाले तरी हा रस्ता काय दुरूस्त होईना.प्रवाशी व वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करताना हैराण झाले आहेत, अनेकांचे अपघात झाले आहेत. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत. तळोदा तालुक्याचा विचार केला तर शहादाहून तळोदाला जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय आहे.वर्षानुवर्ष हा रस्ता सुद्धा दुर्लक्षित आहे. खेडेगावातील रस्त्यांची दुरवस्था आहे.अक्कलकुवा तालुक्याचा विचार केला तर रस्त्यांची भयानक अवस्था आहे.अजूनही काही गावांत जायला रस्ताच नाही.तळोदा हून अककलकुवाला जाणारा रस्तासुद्धा  खड्डेमय आहे.
                  नंदूरबार तालुक्याचा विचार केला तर शहरी भागातील काॅलनीत अजूनही रस्ते नाहीत. दंडपाणेश्वर ते सरकारी दवाखाना सिव्हिल हा रस्ता अत्यंत खड्डेमय आहे. खेडेगावातील रस्त्यांची निष्कृष्ट काम सुरू आहे.उदा.सागाडी फाटा ते ढोंग पर्यंत.नवापूर तालुक्याचा विचार केला तर नवापूर पासून ढोकरे कारखाना,डोगेगाव, खांडबारा हा रस्ता अत्यंत खराब आहे.खांडबारा पासून देवमोगराला जाणारा रस्ताही खूपच खड्डेमय आहे.साक्री तालुक्यातील खेडेगावात जाणारे रस्ते खूपच खड्डेमय आहेत.काही ठिकाणी रस्तेच नाहीत. 
                   शिरपूर तालुक्याचा विचार केला तर रस्त्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून खूपच संघर्ष केला आहे.जोयदा ते दोंडवाडी हा ५० लाखांचा रस्ता चोरीला गेला होता,या रस्त्याचा भ्रष्टाचार बिरसा फायटर्स धुळे टिमने उकडून काढला.जोडद अबनपूर येथील ६५ लाखाचा पूल चोरीला गेला त्या विरोधात बिरसा फाइटर्स टिमने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे.या तालुक्यात दरवर्षी रस्ता दुरूस्तीसाठी करोडो निधी आणला जातो व त्यात भ्रष्टाचार केला जातो. खेडेगावातील रस्ते दयनीय आहेत.क्रांतीकारक खाज्या नाईक यांच्या बाटवापाडा येथील स्मृतीस्थळी जाणारा रस्ता आजही तसाच आहे.खासदार हिना गावित यांनी हा रस्ता करतो म्हणून आश्वासन दिले होते,८ वर्षे झालीत, परंतु या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाहीत.
          नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचा संकल्प आम्ही केला आहे,अशी प्रतिक्रिया  सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments