राज्यस्तरीय आदिवासी महासंमेलनात सुशिलकुमार पावरांचा विजयकुमार गावितांवर घणाघात
नंदूरबार: समान नागरी लागू झाल्यास आदिवासींची मूळ ओळख नष्ट होईल,आदिवासींचे संवैधानिक आरक्षण संपवण्याचे सरकारचे हे षडयंत्र आहे.समान नागरी कायदा लागू झाल्यास आदिवासींचा कस्टमरी लाॅ नष्ट होईल, ५ वी व ६ वी अनुसूची आदिवासी श्रेत्रात लागू होण्यास बाधा निर्माण होईल, पेसा कायदा नाहीसा होईल, आदिवासींचे आरक्षण संपविण्यात येईल.आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात 'समान नागरी कायद्यामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धोका नाही',असे वक्तव्य केले होते.यावर सुशिलकुमार पावरा यांनी जोरदार घणाघात करीत म्हटले की, विजयकुमार गावित यांना समान नागरी कायद्याचा धोका नाही,परंतु आम्हा आदिवासींना त्या कायद्याचा धोका आहे.म्हणून आम्ही सरकार दरबारी वारंवार निवेदन देऊन व रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे या कायद्याचा विरोध करतोय, आदिवासी बांधवांनी हा कायदा लागू नको व्हायला पाहिजे,म्हणून प्रखर विरोध केला पाहिजे.असे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आयोजित नंदूरबार येथील राज्यस्तरीय आदिवासी महासंमेलनात आदिवासी बांधवांना संबोधित केले.
डिलीस्टींगचा भ्रम पसरवून काही हिंदूवादी संघटना आदिवासींमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र करत आहे.भारतीय राज्य घटनेच्या कलम अन्वये आदिवासी कोणताही धर्म स्वीकारण्यास अधिकार आहे.आदिवासींचे आरक्षण हे धर्मांवरून नव्हे,तर जमातीवरून ठरते. केंद्र सरकारने नवीन वन संरक्षण कायदा २०२३ बनवून आदिवासींना जल,जंगल व जमीन पासून बेदखल करण्याचा कट कारस्थान करीत आहे.सरकारी योजनांचे खाजगीकरण करून आदिवासी मुलांना शिक्षणापासून व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सरकार करत आहे.सरकारच्या या चूकीच्या व आदिवासी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकजूट होऊया,असे आवाहन सुशिलकुमार पावरा यांनी केले.
0 Comments