बागलाण आदिवासी ग्रामस्थ मोराणे(सांडस)तालुका बागलाण येथील गावठाण जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणने काढणेबाबत तसेच आदिवासींचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मा.तहसीलदार बागलाण.तहसील कार्यालय,सटाणा तसेच मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती.
सटाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, यावेळी बिरसा फायटर्स राज्य सचिव संजय दळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की बागलाण तालुक्यातील मोराणे(सांडस) येथील गावठाण जमिनीवर गावातील काही वरिष्ठ,राजकीय
तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी आज रोजी खूपच अतिक्रमण केले असून यात खळे,कांदा चाळी या जास्त प्रमाणात असून अगदी जवळच आदिवासी वस्ती असल्याने या चाळीतील कुजलेल्या कांद्यामुळे
अती दुर्गंधी तयार होऊन आदिवासी लोकांचे आरोग्य आज रोजी धोक्यात असून पुढील काळात आजाराचे
प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असून लवकरात लवकर गावठाण जमिनीत बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित अतिक्रमण काढण्यात यावे तसेच येथील ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभार तपासण्यात यावा या जमिनी मध्ये कोणाच्या सांगण्यावरून आज रोजी अतिक्रमणे झाली त्याचा देखील शोध घेऊन या परिस्तिथीस जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी तसेच मोराणे(सांडस) या ग्रामपंचायत मध्ये आदिवासी समाजसाठी दरवर्षी घरकुल यादी येते
परंतु जागा शिल्लक नाही असे म्हणून ग्रामपंचायत हे घरकुल वापस पाठवते व जी गावठाण जमीन आहे ती
आपसात सल्लामसलत करून येथील काही ठराविक
व्यक्ती या गावठाण जागेवर खळे,कांदा चाळी करून
बेकायदेशीर अतिक्रमण करतात त्यामुळे आदिवासी
समाजाला घरकुल साठी यापुढे कधीही जागा मिळूच
शकणार नाही अशी विदारक परिस्थिती झाली असून या गावठाण जमिनीवर त्यांना भविष्यात घरकुल साठी जागा उपलब्ध करून मिळावी अशी आपणाकडे नम्र विनंती आहे..
तरी सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडून विलंब झाल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून पुढील
काळात तीव्र स्वरूपात आमरण उपोषण,आंदोलन याचा अवलंब केला जाईल तसेच प्रशासनातील या कार्य क्षेत्रातील अधिकारी तसेच आदिवासी समाजाचे आरोग्यास कारणीभूत ठरणारे व्यक्ती यांचेवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक १९८९ अधिनियम
कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे कडे प्रकरण चौकशी कामी पाठवण्यात येऊन सदर आदिवासी समाजावर झालेला अन्याय अत्याचार बाबत कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
तरी मोराणे(सांडस)येथील आदिवासी कुटुंबांना सरकारी स्थरावर उचित कार्यवाही करून न्याय देण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे.
0 Comments