Advertisement

गणोर ग्रामपंचायत मार्फत जनावरांचे लसीकरण शिबिर संपन्न

आज दि 7/01/2024 रोजी पशुरोग संवर्धन विभागामार्फत लाळ खुरकत नियंत्रण लसीकरणाचा शिबीर ग्रामपंचायत गणोर मार्फत आयोजित करण्यात आली होती एकूण 250 जानवरांचे लसीकरण करण्यात आले, लाळ खुरकत हा विविध पशूंच्या प्रजाती मध्ये आढळणारा, वेगाने पसरणारा, मोठ्या प्रमाणावर पशूंची हानी करणारा रोग आहे. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. आपल्या सर्व पशुंचे लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण करून पशुरोग नियंत्रण कार्यक्रम योजनेसाठी योगदान द्यावे.असे प्रतिपादन पशु वैद्यकीय अधिकारी dr. एन. एम.पाटील यांनी दिली शिबीर यशस्वी करण्यासाठी dr. चेतन जगदाळे, dr गोविंद तडवी, dr रोहित निकुम यांनी मेहनत घेतली ह्या वेळी,ग्रा. सदस्य राहुल रावताळे युवराज निकुम,जितेंद्र भामरे, किरण निकुम,संतोष निकुम, नितेश भामरे, राकेश भामरे,आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments