Advertisement

मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील आश्रमशाळेत मारहाण झालेल्या विद्यार्थाची जिल्हा संघटक अनंत वनगा व जगदीश धोडी यांनी भेट घेवुन चौकशी केली

प्रतिनिधी : सौरभ कामडी 

शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक मा . जगदीशजी धोडी व पालघर जिल्हा संघटक अनंता वनगा पदाधिकारयांनी मोखाडा तालुक्यातील कारेगाव आश्रमशाळेत जावून मारहाण झालेल्या विद्यार्थाची भेट घेवुन विचारफुस केली
(दि १६/१/२०२४ )रोजी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशातील आदिवासी कुटुंबांशी संवाद साधत असताना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती,तसेच धक्कादायक बाब म्हणजे हा विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत शिक्षकाने त्याला काठीने मारहाण केली होती अशी बातमी सोशल मिडीया व न्युजच्या माध्यमातुन समजली असता शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक श्री जगदीश धोडी व शिवसेना आदिवासी समाज पालघर जिल्हा संघटक अनंता वनगा तसेच पदाधिकारी भरत सांबरे,दयानंद हरल,वैभव भोमटे,सोमा वारे,यांनी कारेगाव आश्रमशाळेत जावुन रुद्राक्ष पागी या विदयार्थी व त्याच्या आईवडिलांची भेट घेवुन सदर प्रकार काय घडला याची विचारफुस करुन चौकशी केली,तसेच मारहाण करणारे शिक्षक हे आश्रमशाळेत दिसले नाहीत,गरिबीची परिस्थिती असल्याने आईवडिलांनी भितीपोटी पोलिसांत तक्रार करण्यास घाबरले होते,परंतू असे प्रकार होत असल्यास किंवा कधी विद्यार्थांनी घाबरुन जीव दिला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आश्रमशाळा मुख्यध्यापक यांना केला,तसेच विद्यार्थांशी संवाद साधुन अडीअडचणी समजुन घेतल्या व सर्व आश्रमशाळेची पहाणी केली तसेच निदर्शनास आलेल्या त्रृटी संदर्भात प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्याशी देवबांध येथे भेट घेवुन मारहाण करणारे शिक्षक यांचे निलंबन करणे,सर्व विद्यार्थांना चांगल जेवण, पोटभर जेवण देणे,विद्यार्थांना झोपण्यासाठी गाद्या,या ठंडीमध्ये विद्यार्थांना ब्लेकेट देणे,या विषयी चर्चा केली तसेच आश्रमशाळेंची व विदयार्थांचे पालक म्हणून जबाबदारी ही प्रकल्प अधिकारी यांची असुन जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रांत येणारया सर्व आश्रमशाळेंची त्यांनी स्वत प्रत्यक्ष भेट घेवुन आश्रमशाळेतील विद्यार्थांबरोबर संवाद साधावा असे सांगण्यात आले,त्यावेळी राज्य संघटक जगदीश धोडी साहेब यांच्या सोबत अनंता वनगा,भरत सांबरे,दया हरल,वैभव हरल,सोमा वारे,इतर पदाधिकारीही उपस्थित होते!

Post a Comment

0 Comments