Advertisement

गणोर ग्रामपंचायत कार्यालय मार्फत स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आले


शहादा:-आज दी 20/01/2024 रोजी ग्राम पंचायत कार्यालय गणोर स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला सार्वजनिक ठिकाण शाळा अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र बस स्थानक ग्रामपंचायत कार्यालय गावातील उकिरडे पाण्याचा टाक्या स्वच्छ करून गावात जनजागृती करण्यात आली स्वच्छता म्हणजे स्वच्छतेने जगण्याची सवय. जिथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते, तिथे शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते. स्वच्छता, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. 
स्वच्छता ही सेवा आहे. आपल्या गावातील आपल्या जीवनात स्वच्छतेची नितांत गरज आहे. घाणीचा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर आणि जीवनावर परिणाम होतो. आपण वैयक्तिक आणि सभोवतालची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि इतरांनाही ते करण्यास प्रेरित केले पाहिजे. असे प्रतिपादन सदस्य राहूल रावताळे यांनी दिलं हया वेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती शितल रावताळे, ग्राम सेवक गुलाब गावित, सदस्य अनिता भामरे, दमयंती पान पाटील, सरला ठाकरे, दिवाण निकुंम, भगतसिंह निकुंम, गटातील कविता भामरे, वसंती निकुंम, वीणा शेल्टे, ममता वळवी, अनिता वळवी,पेसा मोबिलायझर नामदेव वळवी, विशाल ब्राम्हणे ,लक्ष्मण तडवी, अजित पटले, संतोष पान पाटील, शिपाई ओंकार शेल्टे ,वसंत शेल्टे, व गावातली लोकं आदी उपस्थित होत

Post a Comment

0 Comments