पोलिसांवर कारवाईसाठी बिरसा फायटर्स उपोषण करणार: सुशिलकुमार पावरा
शहादा : आज पोलीस ठाणे शहादा येथे बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी निवेदनाची पोहच घेण्यासाठी गेले असता पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या पोलिसांनी अर्ज घेण्यास टाळाटाळ करत सुरवातीलाच आमच्या कार्यकर्त्यांस "तुम्ही आदिवासी आंघोळ करून आले नाहीत "अशा अपमानास्पद शब्दांत तुच्छतेची वागणूक दिली व आमचे निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आम्हाला धक्काबुक्की करत अटक करण्याची धमकी दिली,असल्याचा धक्कादायक खुलासा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.
अपशब्द वापरणा-या व धक्काबुक्की करणा-या संबंधित पोलिसांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे.संबंधित पोलिसांवर ॲस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी बिरसा फायटर्स तर्फे वरिष्ठांकडे करण्यात येणार आहे.आदिवासी समाजासोबत शहादा पोलिसांची तुच्छतेची व भेदभावाची वागणूक निंदनीय आहे.आमच्यासारख्या संघटनेच्या पदाधिका-यांचेच साधे अर्ज शहादा पोलीस ठाण्यात घेतले जात नाहीत, तर सामान्य जनतेचे अर्ज कशे स्वीकारले जातील.एखाद्या सरकारी कार्यालयात एका मिनिटात अर्जावर पोहच मिळते,परंतु शहादा सारख्या पोलीस ठाण्यात साध्या अर्जावर पोहच घेण्यासाठी १ किंवा २ दिवस लागतात, ही एक लाजिरवाणी बाब आहे.एखाद्या खाजगी कंपनीसारखा शहादा पोलिसांचा मनमानी कारभार सुरू आहे.पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे पोलीस ठाण्यात नसल्यास कुठलेच तक्रार अर्ज ठाण्यात घेतले जात नाहीत,ही एक गंभीर बाब आहे.त्यावर वरिष्ठ पोलिसांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.शहादा ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे जागेवर नसतात, नेहमी गैरहजर दिसतात. अशा पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी आम्ही येत्या २० तारखेला उपोषण करणार आहेत.अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 Comments