Advertisement

चर्मकार समाजाच्या उपोषणाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा!

*शहादा पोलीस ठाण्यातील पोलिसांवर कारवाईची मागणी*

शहादा:शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर चर्मकार समाज बांधवांच्या आमरण उपोषणास बिरसा फायटर्स संघटनेचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी नंदूरबार व उपोषणकर्ते यांना दिले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,भिमसिंग वळवी आदि बिरसा फायटर्सचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.
          पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, हेड कॉन्स्टेबल मुकेश राठोड व किरण सूर्यवंशी यांनी शहादा तालुक्यातील चर्मकार समाजाला जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर अँस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा,या मागणीसाठी दिनांक ०७/१२/२०२३ रोजी चर्मकार समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमरण उपोषण सुरू आहे.त्या उपोषणास बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आहोत. 
         दिनांक ०८/१२/२०२३ रोजी शहादा पोलीस ठाण्यातील पोलीसांनी बिरसा फायटर्सच्या आदिवासी कार्यकर्त्यांस" तुम्ही आदिवासी आंघोळ करून आले नाहीत" अशा अपमानास्पद शब्दांत तुच्छतेची वागणूक दिली व निवेदन स्वीकारले नाही,उलट निवेदन द्यायला आले म्हणून तुम्हाला अटक करू म्हणत धक्काबुक्की केली. शहादा येथील काही पोलिसांचे हे जनतेसमोर होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल कारवाई झालीच पाहिजे.संबंधित दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अन्यथा आम्ही आदिवासी समाजबांधव सुद्धा शहादा येथील पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. तरी चर्मकार व आदिवासी समाजबांधवावर अत्याचार करणा-या शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments