Advertisement

गणोर येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले


आज दिनांक 6 /12/ 2023 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी *शिक्षक परिषद* जि प शाळा गणोर येथे आयोजित करण्यात आला. त्यात गणोर गावातील लोकनियुक्त सरपंच सौ. शितल राहुल रावतळे, उपसरपंच सौ. कविता रवींद्र वळवी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राहुल दादा रावताळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , पालक वर्ग तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.तसेच पालक परिषदेत *शैक्षणिक गुणवत्ता वाढ व भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा चर्चा व नियोजन,शाळा विकास आराखडा तयार करणे, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांन बाबत ,सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती सन 2022- 23 वाटप व सन 2023- 24 मागणीबाबत माहिती , सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत ,नवसाक्षर सर्वेक्षण व पुढील नियोजन कार्यवाही बाबत, स्थलांतरित विद्यार्थी बाबत, या विशेष तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे बाबत सविस्तर चर्चा व संवाद साधण्यात आला. पालक परिषदेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक जगदाळे सर, चेतन पाटील सर, प्रकाश जाधव सर , मनोहर निमजे सर, गुलाबसिंग पावरा सर , भोमराज जाधव सर व दामू वळवी सर यांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमजे सर यांनी केले असून आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments