Advertisement

सेवा सम्राट गुणवंत बाबा चराटे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न

 वै.ह.भ.प. गुणवंत बाबा चराटे यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त सेवा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याचे निमंत्रक महंत ईश्वरदास चराटे व श्री सेवा सम्राट गुणवंत बाबा चराटे प्रतिष्ठान होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून १)श्री.बापूसाहेब देशमुख (मूर्तिजापूर) २) श्री.कडू निहाराम सुंभ (मांजरी) ३) श्री.पंकज भाई मेहता (मुंबई) ४) श्री.शिवा सुब्रमण्यम (मुंबई) ५) श्री.प्रशांत भाऊ देशमुख (मुंबई) ६) श्री.डॉ.रश्मी देसाई ७) श्री.बाळासाहेब सानप (नाशिक) ८) प्रमोद सावंत (मुंबई) ९) बापूसाहेब निश्चित (वरखेड) हे होते. यावेळी सेवा सम्राट पुरस्कार हा श्री सखाराम मस्के यांना देण्यात आला तसेच सेवा रत्न पुरस्कार हा श्री डॉक्टर सुनील उबाळे वरखेड यांना देण्यात आला सेवा शिरोमणी पुरस्कार हा श्री चंद्रभान झोजे मालुंजा व सेवा सूर्य पुरस्कार हा शंकरपूर येथील श्री पदम सिंग राजपूत यांना देण्यात आला. 31 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. पदम सिंग राजपूत यांना बालपणापासून अध्यात्माची आवड असल्याने पंचक्रोशीत कुठेही भजन सप्ताह पारायण असेल अशा ठिकाणी आवडीने ते सहभाग घेत सप्ताहाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मिक तेचा उत्कंठ शिगेला पोहोचविला. त्यांनी आपले सहकारी मधुकर पवार दादाभाऊ जगताप अशा सहकाऱ्यांसोबत भारत भ्रमण करीत वैष्णव देवी कैलास पर्वत हरिद्वार ऋषिकेश केदारनाथ बद्रीनाथ अशा तीर्थक्षेत्रावर जाऊन स्वतः तर आत्मानंद घेतलाच पण इतरांनाही त्याची
ओळख करून दिली. अगोदर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने काही गावातील गोरगरीब लोकांना स्वखर्चाने तीर्थक्षेत्रावर नेऊन त्यांना अध्यात्मिकतेचे महत्व पटवून सांगितले व तदनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी ही साखळी पद्धतीने एकमेकांना अध्यात्मिकतेचे महत्व पटवून सांगितले असता आत्ता दरवर्षी पदम सिंग हे 100 भाविकांना भारतभर सर्व तीर्थक्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताह करत आहे. बऱ्याचशा वारकऱ्यांना घेऊन ते आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात ही सहभागी होतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना श्री सेवा सम्राट गुणवंत बाबा चराटे प्रतिष्ठानच्या वतीने सेवा सूर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी आपल्या काही सहकार्यांसोबत थेट मुंबई गाठली त्यांच्यासोबत गावातील उपसरपंच उदल काहाटे. अनिल पोळ. व मधुकर पवार आदी उपस्थित होते. हा सोहळा सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पार पडला.

Post a Comment

0 Comments