Advertisement

शेतकरी गट गणोर येथे सेंद्रिय गटातील शेतकऱ्यांची एक दिवशी प्रशिक्षणाचा आयोजित करण्यात आले

आज दि 15 डिसेम्बर 2023 रोजी कृषी विभाग आत्मा अंतर्गत कृषी कल्याण अभियान परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती)अंतर्गत करहण माता शेतकरी गट गणोर येथे सेंद्रिय गटातील शेतकऱ्यांची एक दिवशी प्रशिक्षणचा आयोजन करण्यात आले होते मार्गदर्शक म्हणून स्वर्ग विकास समिती नितीन वारके उपस्थित गटातील शेतकऱ्यांना शेणखतामधून पिकास पालाश , नत्र व स्फुरद मिळते. शेणखताचा वापर पोषक अन्नद्रव्य म्हणून केला जातो. जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे होते.व तसेच बिडी कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, दशपर्णी अर्क ,जीवामृत, बीजामृत तयार करण्याबाबत सविस्तर माहिती सांगितली.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी ट्रायकोडर्मा हि बुरशी जमिनीमधून होणाऱ्या रोगाच्या नियंत्रणाकरीता अतिशय उपयुक्त असून जमिनीत असणाऱ्या अपायकारक बुरशीना मारण्याचे काम करते असे प्रतिपादन दिले ह्या वेळी गटातील उपस्थित शेतकरी अजित पटले, राहुल रावताळे, देवेंद्र निकुम, संजय तडवी, सुकलाल निकुम, मेरसिंग निकुम, दीपक निकुम, अनिल रावताळे,लक्ष्मण तडवी,तारसिंग ब्राम्हणे,देविदास पटले,न्याहालिक वळवी, जगनाथ पटले,सुनीता रावताळे, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments