Advertisement

सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणेची पदावरून हकालपट्टी!

*बिरसा फायटर्स आक्रमक;पदावरून बडतर्फ करण्याची मागणी*

*पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन* 

शिरपूर:बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष धुळे वसंत पावरा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व सदर घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने धुळ्याचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्याकडे दि.४ डिसेंबर रोजी निवेदन देऊन केली.
                    निवेदनात म्हटले आहे की, सांगवी ता. शिरपूर येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर चारण समाजातील लोकांनी फाडल्यानंतर त्या ठिकाणी दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल घडली होती. दंगल घडली ते ठिकाण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवीच्या अवघ्या ५०० मी. अंतरावर आहे. सदर दंगलीत आदिवासी समाजातील १४० युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
त्या घटनेतील निर्दोष आदिवासी लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मागितला. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नई दिल्ली यांना दि.२३/०८/२०२३ रोजी निवेदन देऊन न्याय मागितला. त्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नई दिल्ली यांनी दि. १३/०९/२०२३ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना नोटीस बजावून सदर घटनेबाबत खुलासा सदर करण्याचे सांगितले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून आलेल्या नोटीसची बदला घेण्यासाठी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे न्याय मागितला म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी, सदर गुन्ह्याचे तपास करणारे अधिकारी गुन्हे अन्वेषण विभाग धुळे यांनी पोलीस पदाचा दुरुपयोग करून बिरसा फायटर्स संघटनेच्या सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.
                      सांगवी येथे घडलेल्या दंगलीत इतर आरोपी म्हणून बिरसा फायटर्सचे अध्यक्ष नाशिक विभाग विलास पावरा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मनोज पावरा, जिल्हाध्यक्ष धुळे वसंत पावरा व सचिव शिरपूर गेंद्या पावरा यांच्यावर गुन्हे दाखल केले. ज्या सांगवी गावात दंगल घडली ते गाव आमच्या गावापासून १५-२० किमी अंतरावर आहे. ज्या दिवशी सांगवी गावात दंगल घडली त्या दिवशी आमच्यापैकी कोणीही घटनास्थळी हजर नव्हते. तसेच त्या दंगलीशी आमचा काहीही संबंध नाही तरीही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
दि.१०/०८/२०२३ रोजी दुपारपासून त्या गावात तणाव होता आणि संध्याकाळी दंगल घडली; आणि दि. ११/०८/२०२३ रोजी आमची तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील गुन्हे अन्वेषण विभाग धुळे यांनी आमची शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे चौकशी केली आणि आमचा लेखी जबाब घेतला. सांगवी या गावात दंगल का घडली, दंगलीला जबाबदार कोण याचे तपास सोडून पोलीस प्रशासन आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मागणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य बरबाद करीत आहेत. जेणेकरून कोणीही आवाज उठवू नये. आम्ही जर खरच गुन्हेगार राहिलो असतो तर सदर घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केलीच नसती.दंगल घडली त्या दिवसापासून कोणाच्या तरी सांगण्यावरून आरोपी ठरविण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी केले. ज्या ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी आदिवासी तरुणांचा दंगलीशी संबंध नसतांनाही आरोपी बनविले ते व्यक्ती व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना सदर घटनेत मुख्य आरोपी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच बिरसा फायटर्स संघटनेच्या सदस्यांवर कोणाच्या सांगण्यावरून तपास अधिकारी गुन्हे अन्वेषण विभाग यांनी गुन्हे दाखल केले ते व्यक्ती व त्यांचे ऐकून नाव समाविष्ट करणारे तपास अधिकारी गुन्हे अन्वेषण विभाग यांनाही सदर घटनेत मुख्य आरोपी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
                    सांगवी येथे घडलेल्या दंगलीची सीबीआय मार्फत चौकशी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी यांनी आदिवासी गरीब जनतेवर आपल्या पदाचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी जिल्हाध्यक्ष धुळे वसंत पावरा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, मानहानीचा गुन्हा व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे. तसेच वसंत पावरा यांच्या उपचारासाठी जो काही खर्च येईल तो खर्च जयेश खलाणे यांच्या पगारातून तिप्पटीने वसूल करण्यात यावे.अन्यथा येत्या काही दिवसात लोकशाही मार्गाने समस्त आदिवासी समाजातर्फे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनासमोर विराट मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.
                  निवेदन देतांना दिपक अहिरे संस्थापक अध्यक्ष, भिल समाज विकास मंच (महा.),बिरसा फायटर्स संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, प्रदेशाध्यक्ष मनोज पावरा, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, तालुकाध्यक्ष शिरपूर ईश्वर मोरे, सचिव गेंद्या पावरा, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, राकांपा माजी जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, सामाजिक कार्यकर्ते रमेश वसावे, कैलास वसावे, मोहन गायकवाड, बिरबल पावरा, श्याम कोकणी, भटू कोकणी आदि ३० ते ३५ कार्यकर्ते उपस्थित होते.प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठांनी सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांची सांगवी येथून हकालपट्टी केली आहे.त्यामुळे पिडीत जनता खूश झाली आहे.तरी जयेश खलाणे यांना पदावरून बडतर्फ करा,त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा,मानहानीचा गुन्हा व ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments