Advertisement

वेळवी येथे बिरसा मुंडा जयंती उत्सव उत्साहात साजरा

१५ नोव्हेंबर हा जनजातीय गौरव दिवस नाही: सुशिलकुमार पावरा

दापोली: १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने वेळवी येथे बिरसा मुंडा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.आदिवासी विकास विभागीय कमिटी कांगवई, वेळवी कलानगर,भोंमडी,विरसई,सुकोंडी व समस्त गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला .कार्यक्रमाची सुरवात सकाळी ११ वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष इंटरनॅशनल आयडॉल तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे होते. आहेत. प्रमुख अतिथीत सुनील खरात गटविकास अधिकारी दापोली,काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य, अशोक पवार उपाध्यक्ष, आशा जाधव महिला अध्यक्षा,रंजित दळवी सरपंच वेळवी,धोंडू चौगुले तंटामुक्त अध्यक्ष,सुनिल दळवी सामाजिक कार्यकर्ते,प्रकाश मोरे बीट हवालदार, मदन खामकर मुख्याध्यापक आश्रमशाळा वेरळ, माल्या जाधव, रमेश पवार, रवींद्र वाघमारे,रामजी वाघमारे,सहदेव वाघमारे,सुरेश वाघमारे,गजानन पवार, दामोदर पवार, बाळाराम पवार, भरत मुकणे,मधूकर वाघमारे,सदानंद वाघमारे,बबन वाघमारे,रेश्मा वाघमारे,निर्मला जाधव, अशोक पवार आदिं उपस्थित होते.
            हा दिवस आदिवासींनी बिरसा मुंडा जयंती म्हणूनच साजरा करायचा,जनजातीय गौरव दिवस म्हणून नाही.९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य महान होते.बिरसा मुंडांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आदिवासी क्रांतीवीरांचा इतिहास काही लोकांनी दाबून ठेवला.तो इतिहास आता लोकांना माहीत पडला आहे.बिरसा मुंडांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदिवासी समूदाय एकत्र येऊ लागला आहे.हे पाहून काही लोकांना दुखु लागले आहे.म्हणून बिरसा मुंडा जयंतीला एक वेगळेच नाव ठेवून आदिवासी समुदायाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.परंतु या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडणार नाही.असे अध्यक्षीय भाषणातून सुशिलकुमार पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दुपारी ३ वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला.रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यात वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.एकूण ५२ नृत्य प्रकार सादर करण्यात आले.प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणा-या स्पर्धकांना आदिवासी विकास विभाग कमिटीतर्फे प्रमाणपत्र व बिरसा फायटर्स संघटनेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments