Advertisement

शहादा येथे महावितरण कंपनीना परिसरातील शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी

 गणोर,आडगाव,बहिरपूर,खरगोन,मुबारकपूर,बिलाडी,परिसरातील शेतकऱ्यांनी आज रोजी कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी,अभियंता महावितरण कंपनी येथे निवेदन देण्यात आले 
निवेदनात म्हटले आहे की मागील दोन महिन्यापासून गणोर, आडगाव, खरगोन, बहिरपूर, मुबारकपुर, बिलाडी या परिसरातील वीज पुरवठा ही एक दिवसाआड सुरू आहे, वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा दिला जातो मात्र आमच्या परिसरात आठ तास पैकी तीन ते चार तास वीज गायब होत असल्याने शेतकऱ्यांना विजेची वाट पहावी लागत आहे.
तसेच पिकाना पाणी देणे गरजेचे असताना वीज वारंवार खंडित होत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
तरी,आम्ही परिसरातील सर्व शेतकरी बांधव आपणास विनंती करतो की, वीज सुरळीत करण्यासाठी मदत करावी अन्यथा वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास २५/११/२०२३ वार शनिवार खेतिया रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

Post a Comment

0 Comments