Advertisement

बिरसा फायटर्सचा सरपंच विजयी; बिजेपीचा दावा खोटा

*बिरसा फायटर्सचे राज्यात २६ सरपंच!*

शहादा: १६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झाला.यात १६ पैकी ९ सरपंच हे बिजेपीचे आहेत ,असा दावा बिजेपीने केला.सातपुडा अस्मिता वाटसप ग्रूपवर गणोर ग्रामपंचायतीचा सरपंच उमेदवार हा बिजेपीचा आहे, असा दावा गोपी पावरा या भाजपा कार्यकर्त्याने केला.त्यासंबंधीत तिस-या चौथ्था व्यक्तींसोबत झालेली संभाषणाची रेकॉर्डिंग ग्रूपवर टाकल्यावर तो दावा खरा आहे,असे एकाने दुजोराही दिला.परंतु त्याच ग्रूपवर असणा-या बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी बिजेपीचा हा दावा खोटा आहे,हे प्रत्यक्षात नवनिर्वाचित सरपंचाच्या बोलण्यातून सिद्ध केले.आपण बिरसा फायटर्सचे पदाधिकारी आहोत.आपला बिजेपी पक्षाशी काहीही संबंध नाही ,आपल्याला कोणत्याही पक्षाने व आमदार राजेश पाडवीनेही निवडणूकीत मदत केली नाही.आपण बिरसा फायटर्सच्या माध्यमातून सुरू केलेल्या कामाचे हे फळ मिळाले आहे.आपले पॅनेल हे स्व: बळावर निवडून आले आहे. अशी प्रतिक्रिया गणोर गाव अध्यक्ष राहूल रावताळे यांनी दिली आहे.त्यानंतर बिजेपी कार्यकर्त्यांनीही आपला दावा खोटा ठरला,मान्य करत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले.
                     गणोर बिरसा फायटर्सचे गाव अध्यक्ष राहूल रावताळे यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या गाव विकास परिवर्तन पॅनलने कुठल्याही पक्षाची व पुढा-याची मदत न घेता स्व: बळावर ही निवडणूक लढवली व आपल्या पॅनलला विजयी केले.सौ.शितल राहूल रावताळे ह्या सरपंच पदावर व इतर सदस्य पदावरसुद्धा गाव विकास परिवर्तन पॅनलचे सदस्य निवडून आले.आपले कार्यकर्ते निवडून आले म्हणून गणोर ग्रामपंचायतचा सरपंच उमेदवार हा बिरसा फायटर्सचा आहे, असा दावा बिरसा फायटर्सने केला आहे. नवनिर्वाचित सरपंच सौ. शीतल राहूल रावताळे यांचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पाडवी,उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,शहादा तालुकाध्यक्ष संदिप रावताळे व गणोर शाखेतील पदाधिकारी व सदस्य,अशा राज्यशाखा , जिल्हा शाखा,तालुका शाखा,गांव शाखेतील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. बिरसा फायटर्सचे राज्यात एकूण २६ सरपंच झाले आहेत.

Post a Comment

0 Comments