धडगाव ते असली रस्ता धोकादायक!
धडगांव:माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या गावाकडे जाणारा धडगाव ते असली रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे.याच रस्त्यावरून १० वर्षे खासदार असणा-या हिना गावित,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित,जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित सुद्धा धरणाचे उद्घाटन करण्यासाठी १५ दिवसांपूर्वी आल्या होत्या.सगळ्याच लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
अस्तंबा यात्रेसाठी सेवाभाव म्हणून काही गावातील ग्रामस्थांनी आपल्या गावातील रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजवले होते.परंतु चूलवड, बायगाया,राडीकलम, जर्ली,पालखा या गावात खड्डे बुजविण्यात आले नव्हते. धडगाव ते चूलवड रस्त्यावर खूपच खड्डे झाले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची दूर्दशा दिसत आहे.या खड्डेमय रस्त्यावर अनेक प्रवाशांचे अपघात होऊन जीव गेले आहेत.या रस्त्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून कालिबेल ते धडगाव पर्यंत खड्ड्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.तरी हा रस्ता दुरूस्त न झाल्यामुळे स्वतःच श्रमदानातून खड्डे बुजविण्यासाठी बिरसा फायटर्सने पुढाकार घेतला आहे.
आपल्या चूलवड गाव हद्दीतील उंबरबारी ते जर्ली पुलापर्यंत रस्त्यावरील खड्डे बिरसा फायटर्स गाव शाखा चूलवड यांच्या पुढाकाराने दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ वार रविवार रोजी सकाळी ११ वाजता श्रमदानातून भुजवायचे ठरले आहे. खड्डे भुजवण्यासाठी आपल्याच गावातील काही प्रतिष्ठित बांधवांकडून ट्रॅक्टर,जेसीपी इत्यादींची शक्य ती मदत मिळणार आहे.पाण्याचे टँकर ग्रामपंचायत चूलवड कडून मिळणार आहे.या श्रमदानात बाहगाया व जर्ली येथील गावक-यांनाही सहभागी व्हावे,असे आवाहन बिरसा फायटर्सचे चूलवड गाव अध्यक्ष सायसिंग पावरा व राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.
0 Comments