Advertisement

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिरूर मध्ये घोड नदीच्या किनारी उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन छटपूजा उत्साहात साजरा केली

रांजणगाव कारेगाव तसेच शिरूर तालुक्यालगतच्या गावांमध्ये एमआयडीसी असल्यामुळे बरेचसे उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करत आहेत. उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश .बिहार अशा राज्यातून ते शिरूर तालुका या ठिकाणी येऊन दहा ते बारा वर्षांपासून वास्तव्य करत आहे. उत्तर भारतीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या छटपूजेनिमित्त हजारो उत्तर भारतीय बांधवांनी भल्या पहाटेपासून घोड नदीच्या किनारी धार्मिक विधी संपन्न केला. यावेळी लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी परिवारासकट हजेरी लावली. गंगा मैया की जय गंगा माता की जय जय गंगेश्वरी अशा विविध जयघोषात गोड नदी चे पात्र दणाणून उठले होते. मध्ये गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रतिबंधामुळे सार्वजनिक ठिकाणी छट महापूजा करता आली नव्हती त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्व उत्तर भारतीय बांधवांनी येऊन हा सण साजरा केला. पहाटे चार वाजेपासूनच महिलांनी पूजा मांडून रांगोळी तसेच होम हवन पहाटे सहा वाजेच्या सुमारास व सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवताला गंगामैयाला वस्त्राबरोबर दूध अभिषेक श्रीफळ व मिठाई असे नैवेद्य देऊन पूजा करण्यात आली. या पूजेचे महत्त्व म्हणजे महापर्व दरवर्षी सूर्योदय वेळी व सूर्यास्ताच्या वेळी नदीच्या किनारी उभे राहून सूर्यदेवतेचे पूजन केले जाते सामाजिक शांती राष्ट्र कल्याणच्या भावनेत हे व्रत केले जाते. या पूजेच्या वेळीस भारतीय संस्कृतीचे काटोकाठ पालन करण्यात आले तसेच स्वच्छताबाबतही काळजी बाळगण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण करावे असे संदेशही यावेळी बऱ्याचशा उत्तर भारतीयांनी दिले. आपल्या चैनल शी बोलताना लाल साहब मौरया. चंद्रकांत दुबे. हेमांग मिश्रा. नितेश पाठक .श्रीनाथ प्रसाद.गोविंद सिंग. इंद्रपाल सिंग. शशिकांत दुबे. यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत साहेब. नगरसेवक मुजफ्फर कुरेशी. मंगेश खंडारे. संगीता मल्लाव. तसेच शिरूर येथील गोसावी समाज ट्रस्टचे अध्यक्ष रवी गोसावी. शिरूर ब्रास बँड संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ करडे. शंकर चाबुकस्वार. रवींद्र सिंग. रामकुमार सिंग. श्रीराम चौधरी. बी के राव. कन्हैया उपाध्याय. अरविंद सिंग. बी के श्रीवास्तव. तसेच या कार्यक्रमाला जगताप सर शिरूर पोलीस स्टेशन यांचे सहयोग लाभले शिरूर नगरपालिका मुख्य अधिकारी माननीय श्रीमती स्मिता काळे मॅडम. श्रीमती वाखारे मॅडम यांनीही सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments