Advertisement

आमदार लताबाई सोनवणे यांच्या अपात्र करा; अन्यथा बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा

राज्यपालांच्या कामगारावर प्रश्न चिन्ह;४महिन्यापूर्वी अभिप्राय तरी कारवाई नाही.
शहादा: शिवसेना शिंदे गटाच्या आमदार श्रीमती लताबाई चंद्रकांत सोनवणे यांना अपात्र करावे,या मागणीची याचिका बिरसा फायटर्स संघटनेने ५५२ पदाधिकाऱ्यांच्या सह्यानिशी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे दाखल केली होती.भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ अन्वये ॲड.भूषण महाजन यांच्या माध्यमातून बिरसा फायटर्सने ही याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर राज्यपाल यांनी केन्द्रीय निवडणूक आयोग दिल्ली यांच्याकडे अभिप्राय मागितला होता.केन्द्रीय निवडणूक आयोग यांच्याविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली.केन्द्रीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी ऑगस्ट २०२३ मध्येच लताबाई चंद्रकांत सोनवणे यांना अपात्र ठरविण्याबाबतचा अभिप्राय दिला असल्याची धक्कादायक बाब न्यायालयासमोर आली.४ महिने उलटून गेले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांना अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय घेत नाहीत, म्हणून बिरसा फायटर्सने राज्यपालांच्या कामगारावरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.         लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी जळगांव जिल्ह्य़ातील चोपडा या अनुसूचित जमातींच्या, आदिवासींच्या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.त्यांचे "टोकरे कोळी" जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र समिती नंदूरबार कडून अवैध ठरविण्यात आले होते.त्या निर्णयाविरोधात लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत निर्णयाला अंतिम स्वरूप दिले आहे.आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांना अपात्र करण्याचा निर्णय राज्यपाल रमेश बैस यांनी तात्काळ घ्यावा,अन्यथा राज्यपालांचे कार्यालय राजभवन मुंबई समोरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments