Advertisement

१५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवसाला बिरसा फायटर्सचा विरोध!

*गटविकास अधिका-याला फटकारले, बिरसा फायटर्स आक्रमक!*

दापोली: १५ नोव्हेंबरला आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने वेळवी येथे बिरसा मुंडा जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आदिवासी विकास विभागीय कमिटी कांगवई, वेळवी कलानगर,भोंमडी,विरसई,सुकोंडी व समस्त गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव व निवृत्त नायब तहसीलदार गोपीनाथ चौधरी हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष इंटरनॅशनल आयडॉल तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे होते.
                क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात सुनील खरात गटविकास अधिकारी दापोली यांनी जनजातीय गौरव दिवसाचे बॅनर लावण्याचा प्रयत्न केला.त्यावर सुशिलकुमार पावरा आक्रमक झाले व गटविकास अधिका-याला कार्यक्रम स्थळी फटकारले. आज भगवान बिरसा मुंडा जयंती आहे,म्हणून जयंती उत्सव म्हणूनच आम्ही हा दिवस साजरा करणार! हा आमचा समाजाचा कार्यक्रम आहे,शासकीय कार्यक्रम नाही,त्यामुळे तुमचे शासनाचे जनजातीय गौरव दिवस तुम्ही इथे लावू शकत नाहीत.मला तुमचे बॅनर अजिबात बघायचे नाही,बॅनरवर क्रांतीकारक बिरसा मुंडांचे नाव व फोटो नाही,अशा जनजातीय गौरव दिवसाला आम्ही महत्त्व देत नाही.९ ऑगस्ट ला आदिवासींचा जागतिक आदिवासी दिवस असतो. तोच आमचा जनजातीय गौरव दिवस आहे,भाजपा सरकारने गेल्या वर्षापासून बिरसा मुंडा जयंतीचे महत्त्व कमी करण्यासाठी त्या दिवशी जनजातीय गौरव दिवस असे वेगळे नाव देऊन आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण देशभरात १५ नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा जयंती म्हणूनच साजरा करण्यात येतो,बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने आदिवासी समाज एकत्र येऊ लागला आहे,संघटित होऊ लागला आहे,जागृत होत आहेत, हे बघून भाजपा सरकारने आदिवासींमध्येच फूट पाडायची आहे,संघटित होऊ द्यायचे नाही आहे,बिरसा मुंडा यांचे नाव पुसायचे आहे,हे षडयंत्र सुरू आहे,त्या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडणार नाही.हा दिवस बिरसा मुंडा जयंती म्हणूनच साजरा केला जाईल.  
अशा शब्दांत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी गटविकास अधिका-याला फटकारले.त्यावर गटविकास अधिका-याने म्हटले की,सर आम्हाला वरून तसे पत्र आले आहे की,हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करावा.
                    काही वेळ कार्यक्रम स्थळी वातावरण तापले,परंतु गटविकास अधिका-याने काढता पाय घेतल्यानंतर सुशिलकुमार पावरा हे शांत झाले.या कार्यक्रमाला काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य, अशोक पवार उपाध्यक्ष, आशा जाधव महिला अध्यक्षा,रंजित दळवी सरपंच वेळवी,धोंडू चौगुले तंटामुक्त अध्यक्ष, सुनिल दळवी सामाजिक कार्यकर्ते,प्रकाश मोरे बीट हवालदार, मदन खामकर मुख्याध्यापक आश्रमशाळा वेरळ, माल्या जाधव, रमेश पवार, रवींद्र वाघमारे,रामजी वाघमारे,सहदेव वाघमारे,सुरेश वाघमारे,गजानन पवार, दामोदर पवार, बाळाराम पवार, भरत मुकणे,मधूकर वाघमारे,सदानंद वाघमारे,बबन वाघमारे,रेश्मा वाघमारे,निर्मला जाधव, अशोक पवार आदिंचा समावेश आहे.दरवर्षी आदिवासी बांधवांकडून बिरसा मुंडा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments